exam 
उत्तर महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत संभ्रमावस्था 

एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : राज्यात बहुतांश शाळांत नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले, तर काही शाळा कोरोनामुळे सुरू होऊ शकल्या नाहीत. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा अद्यापही फारसा प्रतिसाद नाही. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले असले तरी ते किती पचनी पडले हा प्रश्नच आहे. ग्रामीण भागात तर दयनीय अवस्था आहे. या पार्श्‍वभूमीवर दहावी व बारावीच्या बोर्डाचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरवात झाली असून, परीक्षा नेमकी कधी, किती गुणांची, किती अभ्यासक्रमावर आधारित राहील, याबाबत विद्यार्थी, पालक तथा शिक्षकांमध्येही संभ्रमावस्था आहे. 
कोरोनामुळे यंदा नोव्हेंबरअखेरपर्यंत शाळेची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे यंदाचे वर्ष वाया जाणार की काय ही भीती विद्यार्थी व पालकांना असतानाच राज्यात कोरोना नसलेल्या काही भागांत २३ नोव्हेंबरला माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झाल्या. नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. खानदेशात तीनशेपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या माध्यमिक शाळा ८ डिसेंबरला सुरू झाल्या. त्याच दिवशी धुळे जिल्ह्यात ४२१ पैकी ३४४ माध्यमिक शाळा सुरू झाल्या. उर्वरितांपैकी काही शाळा १५ डिसेंबरपासून सुरू झाल्या, तर काही गावांत कोरोना रुग्ण सापडल्याने तेथील शाळा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. 

विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नाही
दरम्यान, नववी ते बारावीचे वर्ग सुरू असलेल्या शाळेतही विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद नाही. कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण फारसे प्रभावी ठरले नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात विशेषतः खेडे किंवा आदिवासी भागात ऑनलाइन शिक्षण किती विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक घेतले, हा संशोधनाचा विषय आहे. अशातच दहावी व बारावीचे परीक्षा अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, परीक्षांसाठी अभ्यासक्रम किती कमी होईल? परीक्षा पूर्ण तीन तासांची की वेळ कमी करणार? वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या वाढेल किंवा कसे? विशेष म्हणजे परीक्षा कधी होईल, असे प्रश्न आहेत. यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्ग संभ्रमात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

Manoj Jarange Patil: "विषय फिट बसला!" 58 लाख नोंदींवर जरांगेंचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT