teacher 
उत्तर महाराष्ट्र

टीईटी नसलेल्या शिक्षकांना दिलासा.. वेतन स्थगित न करण्याबाबत आदेश

कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेत अध्यापनाचे कार्य करणाऱ्या परंतु टि.ई.टी.परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे गेल्या महिन्यात शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्या निर्देशानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नंदुरबार, यांनी वेतन स्थगित करण्याचे आदेश पारित केले होते. वेतन स्थगित करण्याचे आदेश मिळाल्यावर नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. निवेदनाची दखल घेत नाशिक विभागीय उपसंचालक नितीन उपासनी यांनी या बाबत परिपत्रक काढून अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांना दिलासा दिला आहे. 

नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष मुकेश पाटील व पदाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी एम. व्ही. कदम यांना निवेदन देत आपली बाजू मांडली होती. त्यात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका प्रलंबित असल्याने उच्च न्यायालय, मुंबईकडून महत्वपूर्ण निकाल देत ८ मे २०१५ ला दिलेला 'शिक्षक पात्रता परीक्षा'(टीईटी) अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांना लागू नसल्याबाबत निर्णय हा आजही लागू असल्याने टीईटी पास नसलेल्या शिक्षकांचे वेतन थांबवू नये असे सुत्रांनी दिलेल्या माहितीवरून कळविले आहे. 

उपसंचालकांचे पत्र
नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. व्ही.कदम यांच्यामार्फत वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करून पुढील आदेश पारित करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास मिळाले होते. याबाबत नाशिक उपसंचालक नितीन उपासनी यांनी टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे वेतन पुढील आदेश पारित होत नाही तोपर्यंत स्थगित करू नये, असे शासन निर्णयाचे परिपत्रक काढल्यामुळे अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.

शिक्षकांना न्याय
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थेतील शिक्षकांना न्याय मिळविण्याकरिता नंदुरबार जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक नंदुरबार मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मुकेश पाटील, सचिव पुष्पेन्द्र रघुवंशी तसेच महेंद्र फटकाळ, रफिक जहागिरदार, कपूरचंद मराठे, डी‌. डी. साळुंके, फैय्याज खान, मनोहर साळुंके ह्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. या मागणीला यश आल्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी जिल्हा मुख्याध्यापक संघांचे आभार मानले आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT