gharkul 
उत्तर महाराष्ट्र

चक्‍क रस्‍त्‍यातच घरकुल बांधकाम 

शांतीलाल जैन

म्हसावद (नंदुरबार) : येथे वाढते अतिक्रमण ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत असून, ज्याला पटेल तिकडे बांधकाम करत सुटले आहेत. एकाने तर चक्क रस्त्यावरच घरकुल बांधकाम करण्यास सुरवात केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने ते बांधकाम त्वरित बंद करावे, यासाठी ६१ ग्रामस्थांनी सरपंचांना निवेदन दिले. 
शासकीय घरकुल बांधकाम योजनेमुळे एकाच कुटुंबातील चार-पाच सदस्यांना गरज नसताना घरकुल मंजूर झालेले आहे. परिणामी जिकडे जागा मिळेल तिकडे घरकुल बांधकाम करत सुटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, नवीन प्लॉट भागात २०-२५ वर्षांपासून वहिवाट असलेल्या रस्त्यावरच एकाने चक्क घरकुल बांधकाम सुरू केले. हा रस्ता सेंट्रल बँक, डीडीसीसी बँक, म्हसावद विविध कार्यकारी सहकारी संस्था, साईबाबा सहकारी पतसंस्था, सती गोदावरीमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, डी. एड. महाविद्यालय, प्राथमिक शाळा, म्हसावद फाटा याकडे जाणारा जवळचा एकमेव रस्ता आहे. रस्‍त्‍यातील बांधकाम पाहून त्या भागातील ६१ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाला तक्रारी निवेदन देऊन बांधकाम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. 

घरासमोर आणून ठेवले दुकान
एकाने बाजारपेठ भागात रहिवासी घरासमोर चक्क दहा बाय दहाचे दुकानच आणून ठेवले. बाजारपेठ भागातील ग्रामस्थांनी उचलून हनुमान चौकात ठेवले. सकाळी सरपंचांनी तलाठी कार्यालयाच्या रस्त्यावर ठेवले. दरम्यान, म्हसावद गावाला कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. त्या भागातील निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्यही बोलायला तयार नाहीत. 

चौक होताय गायब
गावात वाढणारे पक्के अतिक्रमण, कोठेही टपऱ्या, पत्र्याची दुकाने ठेवून भाडेतत्त्वावर देण्याची कुपद्धत सुरू झाल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ असा खेळ सुरू आहे. गावातील रस्ते अरुंद झाले आहेत, तर चौक अतिक्रमणामुळे गायब होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे घाणीचे साम्राज्यही वाढत आहे. गावातील सर्व अतिक्रमण हटवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: गडकरींचा शब्द, पण वास्तव वेगळं! मुंबई-गोवा महामार्ग अद्याप अपूर्ण, निकृष्ट कामांमुळे संताप, डेडलाईन धोक्यात..

Angarki Chaturthi Special Breakfast: अंगारकी चतुर्थीला बनवा काहीतरी खास! कमी साहित्यात झटपट तयार करा रताळ्याची स्वादिष्ट भाजी

Jannik Sinner: यानिक सिनरसाठी आता पुढचा मार्ग मोकळा?; अल्काराझच्या अनुपस्थितीचा इटालियन, फ्रेंच स्पर्धेत फायदा होण्याची शक्यता!

Vidarbha Heatwave : तापमानाच्या चाळिशीने विदर्भ हैराण; एप्रिल महिन्यात १८ दिवस तापदायक अनुभव

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! जमीन मोजणीला शेजारचा विरोध करीत असल्यास काय करावे? मोजणीसाठी ५९० शेतकऱ्यांनी पोलिसांना मोजले ३० लाख रुपये, वाचा...

SCROLL FOR NEXT