international-environment-day international-environment-day
उत्तर महाराष्ट्र

यंदाही १५ जूनपासून वनमहोत्सव; अगोदर करावी लागणार रोपांची मागणी

यंदाही १५ जूनपासून वनमहोत्सव; अगोदर करावी लागणार रोपांची मागणी

सकाळ डिजिटल टीम

तळोदा (नंदुरबार) : नागरिकांना वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटावे, यासाठी यंदाही १५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान वनमहोत्सव (international environment day) प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, याबाबतचे आदेश महसूल व वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे यांनी काढले आहेत. त्यासाठी सर्वसामान्य शेतकरी, वृक्षप्रेमींना सवलतींच्या दरात रोपे उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. (nandurbar-international-environment-day-celebretion-van-mahotsav)

२०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या वनमहोत्सवात रोपांचा पुरवठा सवलतीच्या दरात करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पावसाळ्यात १५ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान सर्व शासकीय यंत्रणा, आस्थापना, निमशासकीय यंत्रणा व नागरिकांना वृक्षलागवड कार्यक्रमात सहभाग घेता यावा, यासाठी सवलतीच्या दरात रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे.

अगोदर करावी लागणार रोपांची मागणी

रोपनिर्मितीसाठी आर्थिक तरतूद नाही, अशा शासकीय यंत्रणांना वनमहोत्सवाच्या कालावधीत रोपांचा पुरवठा करण्यात येईल. मात्र, यासाठी त्यांनी लागणाऱ्या रोपांची आगाऊ मागणी उपवनसंरक्षक किंवा विभागीय वनाधिकारी, सामाजिक वनीकरण विभागाकडे पत्रकाद्वारे करावी, असे आदेशात म्हटले आहे.

रोप विक्रीचे दर

रोपांचे वर्गीकरण वनमहोत्सव सर्वसाधारण

९ महिन्यांचे १० रुपये २१ रुपये

१८ महिन्यांचे

(२०×३० सेमी) ४० रुपये ७१ रुपये

१८ महिन्यांचे

(२५×४० सेमी) ५० रुपये १०५ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT