fraud
fraud 
उत्तर महाराष्ट्र

कामानिमित्‍ताने परराज्यातून येतात तरूण; पैशांचे आमिष देवून आदिवासी महिलांची फसवणूक 

सकाळवृत्तसेवा

वाण्याविहीर (नंदुरबार) : अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात परराज्यातून विविध कामांसाठी येणाऱ्या व्यक्तींकडून आदिवासी महिला व मुलींची फसवणूक करून त्यांच्यावर अत्याचार होत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा भाजपचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
अक्कलकुवा, धडगाव आदिवासीबहुल तालुके असून, या दोन्ही तालुक्यांत परप्रांतातून व बाहेर जिल्ह्यातून अनेक बांधकाम ठेकेदार, मजूर व इतर व्यवसायानिमित्त येतात. महिलांना पैशाचे आमिष दाखवून पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार करत आहेत. अशा फसवणुकीच्या घटना घडत आहेत. विशेषतः या संबंधित व्यक्तींच्या पहिली पत्नी असतानाही ते आदिवासी मुली व महिलांना पळवून नेतात. यामुळे आदिवासी समाजात रोष निर्माण होत असून, कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा गैरकृत्य करणाऱ्यांची ग्रामपंचायत तसेच तालुका व जिल्हास्तरावर कोणतीही नोंद नसते. अशा व्यक्तींची गाव, तालुकास्तरावर रीतसर नोंदणी होणे गरजेचे आहे. त्यांच्या हातून काही गैरकृत्य झाल्यास योग्य ती कारवाई होणे उपयुक्त ठरेल, असे पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT