bus stand water 
उत्तर महाराष्ट्र

‘एसटी’ महामंडळाचे नवे ब्रिद..प्रवाशांना देणार बाटलीबंद पाणी 

निलेश पाटील

शनिमांडळ (नंदुरबार) : एसटी महामंडळाने बसस्थानकांवर बाटलीबंद पाणी विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ‘नाथजल’ नावाचे ब्रँड असलेले बाटलीबंद पाणी तारकपूर बसस्थानकावर विक्रीसाठी उपलब्ध केले आहे. लवकरच हा ब्रँड राज्यभरातील सर्वच छोट्या-मोठ्या बसस्थानकांवर उपलब्ध होणार आहे. 
महामंडळाच्या बसस्थानकांवर इतर खासगी कंपन्या बाटलीबंद पाणी प्रवाशांना विकत आहेत. महामंडळ गेल्या काही वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या तोट्यात आहे. कोरोनामुळे तो तोटा आणखी वाढला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्यासाठी सरकारची मदत महामंडळाला घ्यावी लागत आहे. महामंडळाने प्रवासी वाहतुकीशिवाय आणखी इतर व्यवसायांत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मालवाहतुकीचा व्यवसाय सुरू केला आहे. या मालवाहतुकीतून काही प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. बसस्थानकांवर प्रवाशांना बाटलीबंद शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी एका खासगी कंपनीशी करार केला आहे. 
 
बाटली मागे मिळणार एक रुपया 
संबंधित कंपनीने एसटीसाठी नाथजल नावाचा ब्रँड असलेल्या बाटल्या तयार केल्या आहेत. एका बाटलीमागे महामंडळाला एक रुपयांचा महसूल मिळणार आहे. बसस्थानकांवर एक लिटरची बाटली पंधरा रुपयांत विकली जाणार आहे. त्यापेक्षा अधिक किमतीने विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यावर कार्यवाही होईल. सर्व छोट्या-मोठ्या बसस्थानकांवर हे बाटलीबंद पाणी उपलब्ध असणार आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission: 'एसआयआर'ला सुप्रीम कोर्टाचे कायदेशीर कवच; अंतर्गत टिपण्या म्हणजे संस्थात्मक मतभेद नव्हेत! मुख्यमंत्र्यांचा पलटवार

Asian Games 2026: राही सरनोबतचा एक 'निशाणा' चुकला अन् भारताचे पदक गेलं; 'Frame hit' चा फुल ड्रामा, ५५ हजार भरून अपील केले पण...

बाबो! विद्या बालनने सगळ्यांसमोर पती सिद्धार्थला केलं किस, रोमँटिक लिपलॉकचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Mumbai News: कोपर्डी प्रकरणी उच्च न्यायालय करणार घटनास्थळाची पाहणी; प्रत्यक्ष पडताळणीचा निर्णय

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT