leopard leopard
उत्तर महाराष्ट्र

बिबट्याच्या मुक्तसंचाराने भिती; खरिपाच्या तयारीत अडचण

बिबट्याच्या मुक्तसंचाराने भिती; खरिपाच्या तयारीत अडचण

सकाळ डिजिटल टीम

तळोदा (नंदुरबार) : तळोदा शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेत शिवारात बिबट्याचा (leopard) मुक्त वावर वाढला असून दररोज शेतकऱ्यांना (Farmer) पायाचे ठसे किंवा बिबट्याचे दर्शन होत आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेत शिवारात शेतकऱ्यांना जाणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे वन विभागाने (Forest department taloda) तत्काळ कारवाई करून तळोदा शिवारात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (taloda-aria-Fear-of-leopard-free-movement)

शहराच्या आजूबाजूच्या शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार दिसून येत आहे. सुशीला पार्क या मानवी वस्तीच्या जवळील जितेंद्र सूर्यवंशी यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळलेत तर मोहन माळी यांच्या शेतातही पायाचे ठसे दिसून आले. त्यात मोठे आणि लहान असे ठसे आहेत. त्यामुळे मादी व तिचे पिलू असा वावर असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी शहरातील शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या कळपातील दोन शेळ्या उंडवा नाला परिसरातून बिबट्याने उचलून नेल्या तर भवर शिवारातील पोलीस पाटील जयेंद्र मगरे यांच्या शेतातील गायीच्या वासरूला बिबट्याने मानेजवळ पकडून जखमी केल्याची घटना घडली आहे.

बिबट्याच्‍या पाऊलखुणा

दररोज कुठे ना कुठे बिबट्याच्या पाऊलखुणा दिसून येत आहेत. त्यात शेतकर्‍यांना शेत शिवारात जाणे अडचणीचे ठरत आहे. सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. रात्री-अपरात्री बोअरवेलच्या वीज पुरवठा सुरु करण्यासाठी व पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जावे लागत आहे. असे असताना बिबट्याच्या भीतीने शेतकऱ्यांचे नियोजन बिघडत आहे. त्यामुळे वनविभागाने एखाद्या शेतकऱ्यावर हल्ला होण्याची वाट न पाहता बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तात्काळ कारवाई करावी व परिसरात पिंजरे लावावेत अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT