village restricted areas
village restricted areas 
उत्तर महाराष्ट्र

तळोद्याच्या चार गावांचे प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर; सर्व प्रकारचे व्यवहार बंद

सकाळवृत्तसेवा

तळोदा (नंदुरबार) : तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या बोरद, रांझणी, आमलाड व खेडले ग्रामपंचायत क्षेत्रात उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी प्रतिबंधित क्षेत्रे घोषित केले आहेत. त्यात प्रतिबंधित क्षेत्र परिसरात ८ ते २२ एप्रिलचा सायंकाळपर्यंत सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 
कोरोनाची सध्याची दुसरी लाट जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पसरली आहे. तालुक्यातील रांझणी, खेडले, बोरद, आमलाड या गावात नव्याने रुग्ण आढळले आहेत. त्यात रांझणी २७, खेडले २०, बोरद १४ व आमलाड गावातील १४ व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी त्या - त्या ग्रामपंचायत क्षेत्रात प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात जाण्या येण्यासाठी निर्बंध लावले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्याकरिता सनियंत्रण अधिकारी म्हणून पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी व त्या - त्या ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी दिली आहे. 

औषध फवारणी
आमलाड येथे सरपंच सदाशिव ठाकरे, उपसरपंच प्रकाश पाटील, ग्रामसेवक वाय. एम. सूर्यवंशी, पोलिस पाटील राजाभाई पाटील, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. सुमित वाणी, ग्रामस्थ अंबालाल पाटील, ग्रामरक्षक दलातील सदस्य धरम ठाकरे, पावबा ठाकरे व ग्रा. प. कर्मचारी संपूर्ण गावात औषध फवारणी करीत आहे. कोरोनाच्या हा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी दिलेले आदेश पाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस विविध गावांमध्ये रुग्ण आढळत असल्याने गावागावात नेमलेल्या ग्रामरक्षक दलांनी अधिक सक्षम होण्याची गरज व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi News: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट, सर्च ऑपरेशन सुरु

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

Meta AI : व्हॉट्सअ‍ॅपवर कसं वापरायचं 'मेटा एआय'? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

"लग्न म्हणजे केवळ नाच-गाणी नाही.. आवश्यक विधींशिवाय झालेला हिंदू विवाह अमान्य"; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Share Market Holiday: आज महाराष्ट्र दिनानिमित्त शेअर बाजार बंद राहणार का? पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT