cet exam cet exam
उत्तर महाराष्ट्र

दहावीच्‍या परीक्षा रद्द पण अकरावी प्रवेशाच्या सीईटीचे काय?

दहावीच्‍या परीक्षा रद्द पण अकरावी प्रवेशाच्या सीईटीचे काय?; शिक्षण विभागाकडून ऑनलाइन सर्वेक्षण

फुंदीलाल माळी

तळोदा (नंदुरबार) : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा (Exam) रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यात येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश देण्यासाठी सीईटी घ्यावी काय? यासाठी शिक्षण विभाग ऑनलाइन सर्वेक्षण (Online survey) घेत आहे. त्यासाठी दोन प्रकारच्या लिंक उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात एक लिंक अकरावीसाठी सीईटीची, (CET Exam) तर दुसरी लिंक शाळा स्तरावर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे शाळांना शक्य होईल का, या संदर्भात आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यात दोन्ही लिंक भरून सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. (ten standerd exam cancel but cet exam process in online survey education department)

कोरोनामुळे इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यात इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी काय? तसेच ही सीईटी परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता दहावीचे विद्यार्थी देऊ शकतील. या सीईटी परीक्षेचे स्वरूप हे ओएमआर पद्धतीनुसार असेल, तसेच सर्व विषयांच्या मिळून एकत्रित एक पेपर व सदरचा पेपरसाठी सुमारे दोन तासांचा वेळ देण्याचे प्रस्तावित आहे. ही परीक्षा साधारणतः जुलै महिन्यामध्ये किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात यावी, असेही सुचविण्यात आले आहे. कोरोनाविषयक सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करून या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर इच्छुक विद्यार्थ्यांना गुणात्मक तत्त्ववर अकरावीमध्ये प्रवेश देता येईल. राज्यातील सर्व अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी संबंधित सर्वेक्षण लिंकमध्ये आपले स्पष्ट मत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मत नोंदविण्याचे आवाहन

दुसरीकडे शाळा स्तरावर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी शाळा तयार आहेत काय, हे जाणून घेण्यासाठी सर्व इयत्ता दहावीचा वर्ग असणाऱ्या शासकीय, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, खासगी व्यवस्थापनाचा शाळांनी सर्वेक्षणामध्ये सहभाग घेऊन आपले मत नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

..असे असेल सर्वेक्षण

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घ्यावी काय, यासाठी विद्यार्थ्यांना आपले नाव लिहून जिल्हा निवडावा लागणार आहे. त्यानंतर शाळेचे नाव टाकून दहावीचे बोर्ड निवडून अकरावी प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी काय, या प्रश्नाचे उत्तर देऊन सबमिट बटणवर क्लिक करावे लागणार आहे. दुसरीकडे शाळेने करावयाच्या सर्वेक्षणात नाव, जिल्हा, शाळेचे नाव, शाळेचा यू डायस क्रमांक, मोबाईल क्रमांक, सर्वेमध्ये भाग घेतलेल्या व्यक्तीचे पदनाम, दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करणे शक्य होईल का? या प्रश्नाचे उत्तर देऊन सबमिट करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

Ulhasnagar Crime : दारू पार्टीतील किरकोळ वादातून मित्राकडून मित्राचा खून; आरोपी शकील शेखला बेड्या

Dombivali News : आमदार राजेश मोरे यांनी पलावा पुलाचे उद्घाटन केले आणि पूल बंद झाला

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

SCROLL FOR NEXT