pratpa collage amalner
pratpa collage amalner 
उत्तर महाराष्ट्र

प्रताप महाविद्यालय देशात ५८ वे, राज्यात १६ वे

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : येथील खानदेश शिक्षण मंडळ संचालित प्रताप महाविद्यालयाला २०२०-२१ मधील देशातील ७४७ स्वायत्त महाविद्यालयांमध्ये ५८ वे तर राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये १६ वे मानांकन प्राप्त झाले आहे. याबाबत एज्युकेशन वर्ल्ड मॅगझीनने मानांकनांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
महाविद्यालयाची एकूणच गुणवत्ता व सुविधा पाहून युजीसी (दिल्ली) तर्फे महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा दिला जातो. गेल्या वर्षीच प्रताप महाविद्यालयाला सर्व नियम व निकषांच्या आधारे स्वायत्त दर्जा मिळाला आहे. अवघ्या वर्षभरातच  महाविद्यालयाने मानांकनाच्या बाबतीत अनेक जुन्या जाणत्या महाविद्यालयांना मागे टाकून नेत्रदीपक झेप घेतली आहे , हे विशेष...!
बंगलुरू येथील नॅक मूल्यांकनातही महाविद्यालयास अत्यंत प्रतिष्टेचे ' ए प्लस ' मूल्यांकन मिळाले आहे. तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाच्या अकॅडमीक ऑडिट मध्ये सर्व कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांमध्ये ८८ गुण मिळवून प्रताप महाविद्यालय अग्रस्थानी आहे.
महाविद्यालयात १९ विषयात पदवी पर्यंत तर १४ विषयात पदव्युत्तर पर्यंत शिक्षण उपलब्ध आहे.


एज्युकेशन वर्ल्डद्वारे प्रताप महाविद्यालयास मिळालेले गुणांकन असे :--
- शिक्षणाची गुणवत्ता २०० पैकी १५८
- शिक्षक कल्याण व विकास १०० पैकी ६२
- अभ्यासक्रम व शिकविणे १०० पैकी ६६
- प्लेसमेंट १०० पैकी ६७
- संसाधने व सोयी-सुविधा १०० पैकी ७३ 
- नेतृत्व  व संचालनाचा दर्जा १०० पैकी ६७
एकूण गुण - ७०० पैकी ४९३

महाविद्यालयाला स्वायत्त दर्जा मिळाल्याबरोबर पहिल्याच वर्षी मिळालेल्या मानांकनाचा मला व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अत्यानंद आहे. मात्र जोपर्यंत आम्ही सर्वोत्कृष्ट मानांकन मिळविणार नाहीत तोपर्यंत आम्ही समाधानी होणार नाहीत.
योगेश मुंदडे, कार्याध्यक्ष, खा.शि.मंडळ, अमळनेर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT