residenational photo
residenational photo 
उत्तर महाराष्ट्र

अनुकंपाची मर्यादा पाचवरून वीस टक्के

सकाळवृत्तसेवा

 
नाशिकः अनुकंपा तत्वावरील पदे भरण्याची मर्यादा आता शासनाने20 टक्‍के केली आहे. 
राज्यात अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी 11670 जण सध्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना कामावर घेण्याचा नियम असला तरी अनेक वर्षापासुन नवीन भरतीच होत नाही. वर्षाला तीन लाख एकुन रिक्त पदापैकी केवळ हजार ते बाराशे तातडीची पदे भरली जातात. त्यात अनुकंपाचे पाच ट्‌क्‍के पदे असतात. वर्षाला केवळ 50 जणांना राज्यभरातुन अनुकंपावर नोकरीची संधी मिळते. आता ही पाच टक्क्याची मर्यादा वीस टक्क्यांवर केली आहे.
 वयाची 45 वर्ष होऊनही आई,वडीलांच्या जागेवर नोकरीचे स्वप्न साकार होत नाही. त्यामुळे त्या नोकरीची आशा सोडावी लागत होती. या सवलतीचा फायदा होत नव्हता. या अन्याया विरुध्द राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने सातत्याने लढा दिला होता.अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समीती होती. मात्र अडीच वर्षात या समीतीने एकही बैठक त्यासाठी घेतली नव्हती. ही बाब संघटनेने आंदोलन करुन त्यांच्या निदर्शनास आणुन दिली होती. पाच टक्‍यांची मर्यादा वाढवावी.असा अग्रह धरला होता. त्यानंतर शासनाने गुरुवारी ( ता.15) आदेश काढुन अनुकंपा तत्वावर आता पाच टक्‍के नव्हे तर 20 टक्‍के पदे भरली जातील. असे म्हटले आहे.त्यामुळे दर वर्षी आता किमान दोनशे जणांना तरी नोकरीची संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
   ही संधी मिळणार असली तरी शासनाने आदेश काढतांना एक अडचण करुन ठेवली आहे.'त्या वर्षात रिक्त होणाऱ्या पदांच्या 20 टक्‍के' या परीपत्रकतील शब्दामुळे पुन्हा अडचणी दिसत आहे.त्यामुळे सहाजीकच आनंदावर विरजन पडत आहे. अगादेरच 'क' व 'ड' पदाची भरती यातुन होते.यातुन 20 टक्‍के पदे किती रिक्त होणार? हा प्रश्‍न आहे. 

गेल्या दहा बारा वर्षा पासुन दिलेल्या लढ्यातुन किमान 15 टक्‍के कोटा वाढवुन मिळाला आहे.त्याचे समाधान आहे. मात्र त्या वर्षात रिक्त होणाऱ्या पदांच्या 20 टक्के या शब्दामुळे अडचण होणार असल्याने तो शब्द वगळावा. यासाठी आमचा लढा सुरु राहणार आहे. 
सुनंदा जरांडे( अध्यक्षा, अनुकंपा कर्मचारी संघटना) 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Freedom At Midnight: 'फ्रिडम एट मिडनाइट' चा फर्स्ट लूक आऊट; जवाहरलाल नेहरूंच्या भूमिकेत 'हा'अभिनेता

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SCROLL FOR NEXT