live 
उत्तर महाराष्ट्र

शोधायला गेले बाँब अन हाती लागली कपड्यांची बँग

वाल्मिक शिरसाठ

देवळाली कॅम्प:  वेळ सकाळी दहाची....ठिकाण देवळाली स्टेशनलगत असलेले सैनिकी आरामगृहाचा आवारातील कचरा कुंडीत बेवारस बॅग आढळली.... एकच धावपळ, तारांबळ उडाली. श्वानपथक,लष्करी अधिकारी, पोलीस बॉम्ब शोधक पथकाच्या तासाभराच्या तपासनीनंतर अखेर हाती लागली ती कपड्यांची आणि कागदपत्रे असलेली बॅंग....सर्वांनी तपासणीच्या ही मोहिम डोळ्यासमवेत अऩुभवल्यानंतर सुटकेचा निश्वाःस सोडला..
 

   पोलीस आयुक्तालयात काल(lता.17)  निनावी पत्राद्वारे देवळाली रेल्वे स्टेशन बॉम्बने उडून देण्याची धमकी देणारे पत्र आल्याने पोलीस यंत्रणेची काल चांगलीच तारांबळ उडाली. दरम्यान देवळाली स्टेशनला लागुनच असलेल्या सैनिकी आरामगृहाच्या आवारात एक जवानाला कचऱ्यांच्या कुंडीत एक बेवारस बॅग आढळून आली. हि बाब वरिष्ठांना सांगितल्यानंतर सर्वांचेच धाबे दणाणून गेले. तत्काळ हा प्रकार रेल्वेचे प्रबंधक आर.एस.बागुल यांना कळविण्यात आल्यानंतर रेल्वे पोलीस,बॉम्बनाशक व श्वान पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अन सुरु झाली बॉम्ब शोधून त्याला नादूरूस्त करण्याची मोहीम. हि बातमी परिसरात पसरताच अनेकांनी रेल्वे स्टेशनवर गर्दी केली.

   बॉम्ब शोध पथकाचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल ढाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बी.जी..पालवे यांनी साडेअकराच्या सुमारास मोहीम सुरु केली. श्वानपथक व आधुनिक यंत्राद्वारे व स्क्रीन वायरने या ब्यागेची तपासणी करण्यात आली. मात्र यात काहीच स्फोटक वस्तू नसल्याची खात्री झाल्यानंतर हि बॅग कचराकुंडीतून अलगद बाहेर काढण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संपतराव लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कृष्णा चव्हाण,विशाल साळुंके,सुनील डावरे,गणपत मुठाळ व संजय बोराडे यांनी पंचनामा केला. या बॅगेत स्वेटर,कपडे,खाद्यपदार्थ व काही कागदपत्रे आढळून आले. अन उपस्थितांनी सुटकेचा श्वास सोडला.  घटनास्थळी खासदार हेमंत गोडसे,कॅन्तोंमेंट बोर्डाचे माजी अध्यक्ष तानाजी करंजकर,अनिल गोडसे यांनी भेट दिली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: अंबादास दानवेंनंतर कोण? विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी 'हे' नाव फायनल?

Cyclist Died during Tour: दुर्दैवी! शर्यतीदरम्यानच १९ वर्षांच्या सायकलपटूचा अपघातात मृत्यू; नेमकं काय झालं, जाणून घ्या

Nagpur Crime : पत्नीस पोटगी देण्यासाठी झाला सोनसाखळी चोर

Virar News : उत्तर भारतीयांची मते कोणाला? यावर वसई विरारमध्ये घडताहेत चर्चा

Nurse Strike: राज्यातील परिचारिकांचा संप, मागण्या मान्य न झाल्यास 'या' तारखेपासून राज्यव्यापी निषेधाची घोषणा, आरोग्य सेवा ठप्प होणार?

SCROLL FOR NEXT