farmar
farmar 
उत्तर महाराष्ट्र

"कोरोना'च्या नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले 

सुधाकर पाटील

भडगाव : कोरोनामुळे जगाचे चाके बंद झाली आहेत. त्यामुळे हातावर पोट असणार्या लोकांचा प्रश्न अवघड बनला आहेच. पण सततच्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटानी हैराण झालेला शेतकरी आणखीणच घायाळतीला आला आहे. तर शेतीबरोबर जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन, दुध व्यवसाय करणार शेतकरी कोरोनाने मरणार्या पेशंट इतकेच दुख: सांगीतला घेऊन कसाबसा तग धरून असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात पाहतांना काळजाला वेदना झाल्यावाचून राहत नाही. 

कोरोना विषाणुने जग बंद पडेल असे कोणाला स्वप्नात ही वाटले नव्हते. पण सध्या जगाची वेगवान चाके थबकुन गेले आहे. भारत ही 14 एप्रिल पर्यंत लाॅकडाऊन राहणार आहे. त्यामुळे अनेक घटकांना मोठा फटका बसल्याचे पहावयास मिळत आहे. उद्योगधंद्याबरोबर शेतीचे अर्थकारण बंद पडून गेले आहे. हातावर पोट भरणार्या मजुरासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


मजुरांचा प्रश्न बिकट 
गेल्या दहा दिवसापासून देशात लाॅकडाऊनच आहे. त्यामुळे उद्योगधंद्याचे चाके बंद पडली. पर्यायाने त्यावर अंवलबून असलेल्या मजुराचा दररोज हात तोंडापर्यंत जाण्याचा मार्गच बंद झाला. जिल्ह्यात जिनिंग व्यवसाय पुर्णपणे बंद आहे. त्यामुळे त्यावर काम करणारे मजुर घर बसून आहेत. एकट्या भडगाव शहरात परप्रातांतुन आलेले 600-700 लोक हे विविध व्यवसायाच्या माध्यमाने पोट भरत होते. त्याचा व्यवसाय बंद पडल्याने खायचे काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे. भंगार विक्रीतून पोट भरणारे ही बेचैन झाले आहेत. असे कितीतरी घटक हे या लाॅकडाऊनमुळे विस्कटून गेले आहे. आज लाॅकडाऊनमुळे समाजातील दानसूर व्यक्ती जागल्याची भुमिका घेत अशांना अन्न पुरविण्याचे काम करत आहे. त्यामुळे ठीक आहे, पण हे अन्नाव्यतिरीक्त लागणारा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न हातावर पोट भरणार्याना सतावतो आहे.


शेतकरी घायाळतीला
कोरोनाचा फटका शेतकर्यानाही मोठ्याप्रणात बसला असल्याचे चित्र आहे. विशेषत: नाशवंत शेती माल उत्पादक शेतकरी लाॅकडाऊनमुळे अडचणीत आला आहे. टरबूज उत्पादक शेतकर्यानी पीक उभे करण्यासाठी लाखो रूपये खर्च केले. पण ते काढणीला आले तेव्हा लाॅकडाऊन असल्याने त्यांना माल बाजारपेठेत घेऊन जाणे अवघड झाले. पर्यायाने त्यांना मातीमोल भागात ते विकावे लागले काही शेतकर्याना ते फेकून द्यावे लागले. तर तीच गत स्विटकाॅर्न (गोड मका) उत्पादक शेतकर्याची झाली. ऐन काढण्याची वेळी सर्वत्र बंद असल्याने त्यांचा उत्पादन ,खर्च ही पदरी पडला नाही. तर गुढी पाडव्याच्या मुहर्तासाठी झेंडु ची फुले लागवड केलेल्या शेतकर्याना फुले झाडावरच कोमेजुन द्यावे लागले. भाजीपाला उत्पादक शेतकर्यानी ही सपाटून मार खावा लागला. या सर्व आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे. अगोदरच परतीच्या पावसाने शेतकरी बेजार झाला होता. त्यात कोरोना विषाणु च्या डंकाने शेतकरी रडकुंडीला आला आहे.


जोडधंदा ही कोरोनाच्या कचाट्यात 
सततच्या नैसर्गिक आपत्त्यानी शेतकरी जेरीस आला आहे. त्यामुळे शेतीबरोबर इतर जोडधंदा असावा म्हणून काही शेतकरी कुक्कुटपालन, दुग्धपालन करतात. मात्र कारणामुळे या व्यवसायाचे ही पुरते कंबरडे मोडल्याचे विदारक चित्र आहे. दुध विक्री मंदावल्याने दुधाचा दर पाच रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे दुध उत्पादक शेतकर्याना जनावरे पोसणे अवघड झाले आहे. तर कोंबडीतुन कोरोना प्रादुर्भाव होता अशी अफवा फीरल्याने कुक्कुटपालन व्यवसाय पार झोपून गेला आहे. शेतकर्याच्या दोन महिन्यांच्या मेहनतीवर कंपन्यानी नांगर फीरविण्यात जमा आहे. तर ज्या शेतकर्यानी स्वतः पक्षी आणुन कुक्कुटपालन केले आहे त्यानां तर लाखो चा फटका बसला आहे. 

शासनाकडून अपेक्षा
कोरोनामुळे जे अनैसर्गिक संकट वाट्याला आले आहे. त्यात शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्याला पुन्हा उभे राहण्यासाठी कोरोनाचा फटका बसलेल्या शेतकर्याना मदतीचा हात द्यावा अशी मागणी होत आहे. लाखो रूपयाचे कर्ज काढुन बांधलेले पोट्री फार्म चे कर्ज कसे फेडायचे? जनावरांना कसे पोसायचे? कष्टाने पीक पिकवूनही ते विक्री न करता फेकून द्यावे लागले त्यावर केलेला खर्च कुठुन आणायचा? असे एक ना अनेक प्रश्न प्रत्यक्ष कोरोना बाधित नाही पण कोरोनाच्या पाश्वभुमीवर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे बाधित झालेल्या शेतकर्याकडुन विचारला जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

Poha Idali: सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार पोहा इडली, जाणून घ्या रेसिपी

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT