suresh patil
suresh patil 
उत्तर महाराष्ट्र

माजी आमदार शिक्षण महर्षी डॉ सुरेश पाटील यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी आमदार डॉ. सुरेश पाटील यांचे आज 1 रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास नृसिंह हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना निधन झाले. त्यांचे वय 95 वर्षे होते. सुरेश पाटील यांनी 1983 ते 1985 या काळात तालुक्याची आमदारकी भूषविली होती.

चोपडा शहर आणि तालुक्यात शिक्षणाची गंगा आणणारे शिक्षण महर्षी डॉ. सुरेश जी. पाटील यांचे महाराष्ट्र स्थापना दिनी तथा कामगार दिनी दुपारी 4.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. डॉ. सुरेश पाटील यांनी चोपडा शहरात 1969 साली उच्च शिक्षणाची सोया व्हावी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना केली होती. तसेच सातपुडा पर्वत रांगांमध्ये आदिवासी भागात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे; या उदात्त हेतूने कर्जाणे (ता. चोपडा) येथेही आदिवासी सेवा मंडळाची स्थापना करून तसेच शहरात कस्तुरबा महिला समाज शिक्षण संस्थेचे स्थापना करून शिक्षणाची गंगा आणून तालुका शालेय व उच्च शिक्षित करण्यासाठी अथक परिश्रमाने व्यवस्था केली. नंतर या संस्थेत दादासाहेबांच्या पत्नी तथा महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट शिक्षण मंत्री या उच्च शिक्षित असल्याने त्यांनी मानसेवी तत्वावर कोणत्याही मानधनाशिवाय या महाविद्यालयात शिकविले. आज त्या संस्थेत बालवाडी पासून तर उच्च शिक्षणाची सर्व व्यवस्था आहे. वैद्यकीय शिक्षण आणि इंजिनिअरिंग चे शिक्षण वगळता इतर सर्व शिक्षणाची व्यवस्था डॉ. सुरेश पाटील यांनी चोपडा तालुक्यात केली असल्याने तालुका शिक्षित होऊन जगभर या संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून संस्थेला नाव लौकिक प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री स्वर्गीय शरदचंद्रिका सुरेश पाटील यांचे पती उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ सुरेश पाटील यांनी चोपडा शहरात 1969 साली उच्च शिक्षण ची व्यवस्था व्हावी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाची स्थापना केली होती तसेच सातपुडा पर्वत आदिवासी भागात आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून कर्जाने (ता. चोपडा) येथेही आदिवासी सेवा मंडळाची स्थापना करून तसेच शहरात कस्तुरबा महिला समाज शिक्षण संस्थेचे स्थापना करून शिक्षणाची गंगा आणून तालुका शालेय व उच्च शिक्षित करण्यासाठी अथक परिश्रमाने व्यवस्था केली. नंतर या संस्थेत दादासाहेबांच्या पत्नी तथा महाराष्ट्राच्या माजी कॅबिनेट शिक्षण मंत्री या उच्च शिक्षित असल्याने त्यांनी मानसेवी तत्वावर कोणत्याही मानधनाशिवाय या महाविद्यालयात शिकविले. आज त्या संस्थेत बालवाडी पासून तर उच्च शिक्षणाची सर्व व्यवस्था आहे. वैद्यकीय शिक्षण आणि इंजिनिअरिंग चे शिक्षण वगळता इतर सर्व शिक्षणाची व्यवस्था मा डॉ. सुरेशदादा पाटील यांनी चोपडा तालुक्यात केली असल्याने तालुका शिक्षित होऊन जगभर या संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असून संस्थेला नाव लौकिक प्राप्त केला आहे. आज दि 1 रोजी दादासाहेब यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत दुपारी 4:15 वाजता मालवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT