residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

पुढील वर्षी विभागात साडे 5 हजार सहकारी संस्थाच्या निवडणूका 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - पुढील आर्थिक वर्षात ÷उत्तर महाराष्ट्रातील साडे 5 हजारावर सहकारी संस्थाच्या निवडणूका होणार आहेत. विभागातील 18 हजार 42 संस्था कार्यरत असून पुढील 2020 मध्ये 5 हजार 318 संस्था निवडणुकीस पात्र आहेत. त्यात उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकांचा समावेश आहे. 

नाशिकला आज राज्य सहकारी निवडणूक प्राधिकारणाचे आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातपूरला नाईस सभागृहात विभागातील सहकारी संस्थाच्या 
निवडणूक आढावा बैठक झाली. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी, विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती लाठकर, विभागीय सहसंचालक बाजीराव 
शिंदे उपस्थित होते. डॉ. पाटील यांनी संस्थांच्या निवडणूक नियोजनाचा जिल्हानिहाय आढावा घेतला. 

बैठकीत, श्रीमती लाटकर यांनी विभागातील आगामी निवडणूकांची माहीती देताना, विभागात अ वर्गातील 4 जिल्हा मध्यवर्ती बॅंका, ब वर्गातील 2 हजार 63, क वर्गातील 1 हजार 637 तर ड वर्गातील 1 हजार 41 संस्था निवडणूकीस पात्र आहेत. दुग्ध विकास विभागाकडील 617, सारख कारखाने 11 निवडणुकीस पात्र आहेत. नाशिक विभागात एकुण बाजार समित्यांची संख्या 53 असून त्यापैकी 38 बाजार समित्या सन 2020 मध्ये निवडणूकीस पात्र असल्याची माहिती दिली. त्यानुषंगाने संबंधित संस्थांच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपण्यापुर्वी संचालक मंडळाच्या निवडणुका पूर्ण कराव्यात अशी सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिली. 

प्रलंबित निवडणूकांचे निर्देश 
ज्या संचालक मंडळांना 5 वर्षाचा कालावधी पूर्ण झाला असेल ते संचालक मंडळ कार्यरत राहणार नाही याची निबंधकांनी दक्षता घ्यावी. विहीत मुदतीत निवडणूक प्रक्रिया पार न पाडणाऱ्या संस्थांवर कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई पुर्ण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिली. 2019 मधील प्रलंबित सहकारी संस्थांच्या निवडणूका जानेवारी -2020 पर्यंत नियोजन आराखड्याच्या काटेकोरपणे अंमलबजावणीच्या सूचना अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. निवडणूक घेणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी विभागनिहाय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम मशिनद्वारे घेण्याचा विचार करण्यात येईल. निवडणूक कामकाजात मनुष्यबळ कमी पडल्यास इतर विभागातील कर्मचाऱ्यांची सेवा मिळविण्यासाठी कायद्यातील तरतूदीनुसार कार्यवाहीचे निर्देश डॉ.पाटील यांनी दिले. यामुळे अद्यावत कामकाज करण्यात अधिक गती मिळेल तसेच त्यातूनही लोकांना चांगले आणि झटपट काम मिळण्यास मदत होईल, लोकांचे समाधान नक्कीच होईल,असे म्हटले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT