engineer 
उत्तर महाराष्ट्र

"एसी केबिन'मधून मजुरीसाठी थेट शेतात! 

एल. बी. चौधरी

सोनगीर : मुलगा इंजिनिअर आहे. पुण्याला जॉब करतो. पगार कमी असला तरी भविष्यात वाढेल. मग फ्लॅट वगैरे घेता येईल. आज थोड्या काटकसरीत राहावे लागेल पण भविष्यात सर्व सुरळीत होईल, या अपेक्षेने वडिलांनी माझा विवाह लावला. कोरोनामुळे आज मला शेतीत काम करावे लागत आहे. काय सांगणार आता वडिलांना..? विवाहित महिलेच्या या प्रातिनिधिक प्रतिक्रियेने "लॉक डाउन'मुळे झालेली विदारकता स्पष्ट झाली आहे. 
"कोरोना'चा सर्वाधिक फटका औद्योगिक क्षेत्राला बसला असून, अनेक कंपन्या बंद पडल्या. पुणे, मुंबई, औरंगाबाद आदी मोठ्या महानगरांत विविध कंपन्यांमध्ये नोकरी करणारे हजारो इंजिनिअर, आयटीआय झालेले व अन्य शिक्षित युवक गावाकडे परतले असून, त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. शहरातील नोकरीत सुरक्षित भविष्य पाहणाऱ्या युवकांचा हिरमोड झाला. एवढेच नव्हे, तर मोठा हुंडा, मानपान देऊन प्रसंगी कर्ज काढून मुलींचे लग्न लावून देणाऱ्या वधुपित्यांचे काळीज मात्र तुटत आहे. 
कोरोनामुळे मोठ्या शहरांत विविध कंपन्यांमध्ये कामासाठी गेलेले हजारो युवक गावाकडे परतले आहेत. सुरवातीला बरेच जण घरीच बसून होते. मात्र, पुन्हा नोकरीवर रुजू होऊच याची शाश्‍वती नसल्याने अनेक युवक आता स्वतःच्या शेतासह अन्यत्र रोजंदारीने मजुरीसाठी जाऊ लागले आहे. यातील काही जण तर सपत्नीक शेतात जात आहेत. जे हात रोज हजार-दोन हजार रुपये रोज कमावत होते त्यांना आता दोनशे रुपयांसाठी शेतात दिवसभर राबावे लागत आहे. काही जण बांधकाम, वीटभट्टी, ट्रॅक्‍टर, वाहन दुरुस्ती, वीजपंप, पंखे दुरुस्ती व अन्य ठिकाणी मिळेल ते काम करीत आहेत. 

मजुरांच्या संख्येत वाढ 
तालुक्‍यातील कुशल-अकुशल कामगार, मजूर गावाकडे घरी परतल्याने शेतमजुरांची संख्या वाढली आहे. हजारो युवकांचा राजकारणात वापर करून घेऊनही स्थानिक राजकारण्यांनी औद्योगिक विकास केला नाहीच; पण साखर कारखाने, सूतगिरण्या बुडवून हजारोंना बेरोजगार करण्याचे काम केले. तालुक्‍यात मोठे औद्योगिक प्रकल्पच नसल्याने हजारो शिक्षित तरुणांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागते, ही शोकांतिका कधी दूर होणार हाच खरा प्रश्‍न आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital RCC Slab Collapse : माणुसकी धावून आली अन् ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्या 7 कामगारांचा बचावला जीव; मिरजेत अंगावर काटा आणणारं दृश्य

Satara DCC Bank: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘लातूर पॅटर्न’ची चर्चा; १० वर्षांच्या संचालकांवर टांगती तलवार?

Pune News: गणेशोत्सवातील गर्दीने पुणेकर धास्तावले; ‘दुर्घटना होण्याची वाट बघायची का?’ प्रशासनासह नागरिकांनाही सवाल

Marathi News Live Updates : आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Sangli Krishna River Pollution : सांगलीच्या कृष्णेचे पाणी हिरवेगार का झाले? आयुक्त संजीता महापात्र यांनी केला धक्कादायक दावा, 'गौरी-गणपती विसर्जन ठरले कारणीभूत'

SCROLL FOR NEXT