उत्तर महाराष्ट्र

धुळे जिल्ह्यात दवाखानेही "लॉक डाऊन'

सकाळवृत्तसेवा


धुळे ः कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासह गर्दी टाळण्यासाठी देशासह जिल्हा "लॉक डाउन' झाला. यात त्या- त्या भागातील बहुतांश डॉक्‍टरांनी भीतीने दवाखाने "लॉक डाउन' केल्याने "प्रिस्क्रिप्शन' नाही. मग मेडिकल दुकानावर येणार कोण, असा संबंधित व्यावसायिकांचा प्रश्‍न आहे. मग अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्याचा शासनाचा उद्देश खरा मानायचा का, असा प्रश्‍न उपस्थित करत पीडित नागरिकांनी वैद्यकीय व्यावसायिकांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी सुरू झाल्या आहेत. 


निजामपूर-जैताणेत नाराजी 
निजामपूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील काही खासगी डॉक्‍टर वैद्यकीय सेवा पुरवीत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते युसूफ सय्यद यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदार व वैद्यकीय अधीक्षकांकडे दूरध्वनीद्वारे केला. 


मुस्लिम भागात अडचणी 
न्याहळोद ः धुळे शहरातील मुस्लिमबहुल भागातील खासगी डॉक्‍टरांनी दवाखाने दोन दिवसांपासून बंद केले. यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, डॉक्‍टरच उपलब्ध होत नसल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. 
फागणे आरोग्य उपकेंद्राला कुलूप 
फागणे (ता. धुळे) येथील आरोग्य उपकेंद्राला मात्र "लॉक' दिसून आल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्‍त केला. उपकेंद्राला दोन- तीन दिवसांपासून कुलूप असल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

नागरिकांनी संयम ठेवावा ः "आयएमए' 
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या धुळे शाखेने कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी शहरातील सर्व खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण वैद्यकीय सेवा मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सर्व वैकल्पिक शस्त्रक्रियाही बंद ठेवण्यात येणार आहेत. केवळ अत्यावश्‍यक आणि आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. रुग्णांनी आवश्‍यक असल्यासच सेवा घेण्यास यावे. रुग्णासोबत एकाच नातेवाइकाने थांबावे, डॉक्‍टरांशी व कर्मचाऱ्यांशी योग्य ती काळजी घेऊन व योग्य अंतर ठेवून संपर्क साधावा. रुग्णांनी व नातेवाइकांनी या प्रसंगात संयम पाळावा, असे आवाहन "आयएमए'ने केले. 

डॉक्‍टरांनी सेवा द्यावी ः शिवसेना 
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी आवाहन केले, की न घाबरता, स्वतः सुरक्षित राहून सर्व डॉक्‍टरांनी जनतेला अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा द्यावी. डॉक्‍टर जनतेसाठी परमेश्वराचे रूप आहे. नागरिक दवाखान्यांमध्ये गर्दी करतात, वेळोवेळी तपासणीसाठी जातात. सध्या संचारबंदी असल्याने प्रसंगी दवाखान्यांमध्ये गर्दी करू नये, गरज व अस्वस्थ वाटू लागल्यास डॉक्‍टरांकडे जावे. एखादा किंवा दुसरा नातेवाईक सोबत ठेवावा. प्रसंगी डॉक्‍टरांनी नकार दिला तर 94222 85259 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT