उत्तर महाराष्ट्र

खानदेशात कानूमातेच्या स्वागताची जय्यद तयारी; बाजारपेठ उजळली

Khandesh Kanbai Festival News खानदेशात श्रावणातील पहिल्या रविवारी कानूमातेची घरोघरी स्थापना होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाजतगाजत कानूमातेला निरोप दिला जातो.

निखील सुर्यवंशी


धुळे : दीपआमवास्या आणि श्रावणातील वेगवेगळे उत्सव, व्रतवैकल्ये लक्षात घेत बाजारात (market) ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. दीपआमवास्येला घरातील पिढीजात दिवे उजळले जातात, तर अनेक जण नवीन दिवे खरेदी करतात. खानदेशात (Khandesh) श्रावणात अनेक घरांमध्ये कानूमातेचे आगमन होते. परंपरा जोपासत कानूमातेच्या मुखवट्यात आणि शृंगार साहित्यात भर घातली जाते. त्यामुळे शहरातील भांडी बाजारात वेगवेगळ्या आकाराचे दिवे आणि कानूमातेचे मुखवटे घेण्यासाठी भाविक गर्दी करू लागले आहेत.
(khandesh kanbai festival welcome in market crowds)


दीपआमवास्या आठवडाभरावर आली आहे. त्यानंतर व्रतवैकल्ये घेऊन येणारा श्रावण सुरू होत आहे. त्यामुळे साहजिकच महिला वर्गात उत्साह संचारला आहे. या दिवशी पिढीजात दिवे स्वच्छ करून आयुष्य प्रकाशमान व्हावे, अशी प्रार्थना केली जाते. अनेक जण या दिवशी दिव्यांमध्ये भर घालतात, तर काही जण नवे दिवे खरेदी करतात. तांबे, पितळ आणि पंचधातूचे दिवे प्रामुख्याने खरेदी केले जातात. दीपआमवास्येसाठी अनेक महिला आता दिवे खरेदी करू लागल्या आहेत. शहरातील भांडी बाजारात तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपयांचे दिवे उपलब्ध आहेत.

यंदा श्रावणात पाच सोमवार
दीपआमवास्येच्या दुसऱ्या दिवसापासून श्रावणास सुरवात होते. यंदा श्रावणात पाच सोमवार येणार आहेत. त्यामुळे व्रतवैकल्ये करण्यास सोयीचा दिवस निवडणे शक्य होणार आहे. खानदेशात श्रावणातील पहिल्या रविवारी कानूमातेची घरोघरी स्थापना होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वाजतगाजत कानूमातेला निरोप दिला जातो. कुलाचाराप्रमाणे कानूमातेची स्थापना होते. काही घरांमध्ये पंचधातूचा मुखवटा स्थापन केला जातो. काही घरांमध्ये नारळ रूपात असलेली कानूमाता स्थापन केली जाते.

कानूमातेच्या सजावटीसाठी लगबग

कुलाचाराप्रमाणे कानूमातेच्या मुखवट्यात भर घातली जाते. ज्यांच्याकडे नारळ स्वरूपात कानूमाता असते ते शृंगार साहित्यात भर घालतात. त्यात प्रामुख्याने नथ, बिंदी, कर्णफुले अशा अलंकारांचा समावेश असतो. नागरिकांना अपेक्षित असलेल्या आकारातील दिवे उपलब्ध आहेत. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर आता पुन्हा महिलांकडून तांब्या-पितळाच्या दिव्यांसह भांड्यांना मागणी वाढली आहे, असे व्यावसायिक तुषार डंबीर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT