Help 
उत्तर महाराष्ट्र

धुळे तालुक्यात 13 हजारांवर लाभार्थी कुटुंबांना मिळणार खावटी

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे आयोजित आज देवपूर धुळे येथील शासकिय वसतीगृहात खावटी किटचे वाटप करण्यात आले.

तुषार देवरे

देऊर : काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने सुरु केलेली आदिवासी बांधवांसाठी (Tribal society) असलेली खावटी अनुदान योजना मागील पाच वर्षात भाजपा सरकारने ( Formal BJP government) बंद केली होती. मात्र महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi government) ही योजना पुन्हा सुरु करुन आदिवासी बांधवांना कोरोनाच्या संकटात खर्‍या अर्थाने आधार देण्याचे काम केले आहे. धुळे तालुक्यात खावटी अनुदान योजनेंतर्गत (Khawati grant scheme) एकूण 13 हजार 894 लाभार्थी कुटूंबांना कीट मिळणार आहे. आदिवासी बांधवांच्या पाठिशी काँग्रेस पक्ष  सक्षम उभा आहे. असे आमदार कुणाल पाटील (MLA Kunal Patil) यांनी सांगितले.

जागतिक आदिवासी दिन निमित्ताने धुळे तालुक्यात आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात पिंप्री (ता.धुळे) येथील 25 लाभार्थ्यांना रुपये दोन हजार किंमीचे खावटी किटचे वाटप झाले. त्यावेळी ते बोलत होते.आदिवासी विकास विभागातंर्गत राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे आयोजित आज देवपूर धुळे येथील शासकिय वसतीगृहात खावटी किटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रकल्प अधिकारी एन.डी.जानगर होते. किटमध्ये मटकी, चवळी, हरभरा, पांढरा वटाणा, तुरदाळ, उडीद दाळ, मीठ, गरम मसाला, शेंगदाणा तेल, मिरची पावडर, चहा पावडर, साखर या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. तर दोन हजार रुपयांची रक्कम लाभार्थी कुटूंब प्रमुखाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. खावटी अनुदान डीबीटी योजनेंतर्गत धुळे तालुक्यात 9 हजार 772 लाभार्थी कुटुंबांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रूपये वर्ग करण्यात आले.उर्वरीत लाभार्थ्यांची कागदपत्रांची पूर्तता करुन त्यांनाही लवकरच खावटी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

आमदार श्री.पाटील म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असतांना आदिवासी बांधवांसाठी खावटी अनुदान योजनेची सुरुवात झाली होती. मात्र मागील पाच वर्षात भाजपाच्या सरकारने ही योजना बंद केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्याने आता पुन्हा ही योजना सुरु केली. काँग्रेस पक्षाने नेहमीच आदिवासी,दलित,गोरगरीब जनतेच्या पाठीवर मायेचा हात ठेवला आहे. पिढ्यानपिढ्या झोपडीत राहणारा आदिवासी बांधवाला पक्की घरे देण्याचे काम स्व.इंदिरा गांधी यांनी केले. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून या समाजात प्रगतीचे नवे वातावरण निर्माण करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. खावटी वाटप पारदर्शी करा. वंचित लाभार्थ्यांनाही खावटी अनुदान योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करणार आहे. बा

जार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, माजी पं.स.सदस्य पंढरीनाथ पाटील,ज्येष्ठ नेते बळीराम राठोड, धुळे तालुका काँग्रेस कार्याध्यक्ष अशोक सुडके, संचालक बापू खैरनार, भाऊसाहेब पाटील, फागणे सरपंच कैलास पाटील, शालीक ठाकरे, कुसुंब्याचे भैय्या शिंदे, प्रा.दिलिप शिंदे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी.के.ठाकरे, लेखाधिकारी एस.बी.बागुल, उपप्रादेशिक व्यवस्थापक शुभांगी शिरसाठ, शिक्षण विस्तार अधिकारी ए.आर.पाटील, काँग्रेसचे हर्षल साळुंके, राजीव पाटील,सागर पाटील, वसतिगृहाचे उदय पवार,डिगंबर परदेशी, रविंद्र शिंदे, धनराज पाटील, पी.टी.ठाकूर, श्री.नवटे, नांद्रेचे मुख्याध्यापक एस.टी.पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT