Kirtankar 
उत्तर महाराष्ट्र

मुस्लीम कीर्तनकार हभप शेख महाराजांचे किर्तन सेवा देतांना निधन..

महाराष्ट्रातील हजारो वर्षांच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे ते खरे पाईक होते. त्यांना महाराष्ट्रात किर्तन सम्राट म्हणून ओळखले जाते.

प्रा. भगवान जगदाळे

औरंगाबाद येथे त्यांचे वास्तव्य होते. ते उत्तम गायनाचार्य होते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी मराठी वाड:मय व संत साहित्यावर पीएच.डी.केलेली होती.

निजामपूर (धुळे) : राष्ट्रीय मुस्लिम कीर्तनकार (Kirtankar) तथा वारकरी संप्रदायाचे प्रचारक व प्रसारक ताजोद्दीन शेख महाराज (अंदाजे वय ५७) यांचे सोमवारी (ता.२७) रात्री साडेनऊ-दहाच्या सुमारास माळमाथा परिसरातील जामदे (ता.साक्री) येथे ज्ञानेश्वरी पारायण व किर्तन सप्ताहादरम्यान किर्तनसेवा देतानाच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू (Death) झाल्याने वारकरी बांधवांवर शोककळा पसरली आहे. दरम्यान त्यांना जामदेहून प्रथमोपचारासाठी तातडीने शनिमांडळ व नंदुरबार येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु दरम्यानच्या काळात त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान नंदुरबारहुन त्यांचे शव औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे समजते.

त्यांनी आयुष्यभर हिंदू धर्माचे पालन केले. हिंदू धर्माचे ते राष्ट्रीय प्रचारक होते. संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा आदी ठिकाणी त्यांनी कीर्तनसेवा दिली होती. त्यांनी हजारों कीर्तने प्रवचने केली. त्यांना मानणारा लाखोंवर चाहता वर्ग आहे. महाराष्ट्रातील हजारो वर्षांच्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे ते खरे पाईक होते. त्यांना महाराष्ट्रात किर्तन सम्राट म्हणून ओळखले जाते. औरंगाबाद येथे त्यांचे वास्तव्य होते. ते उत्तम गायनाचार्य होते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांनी मराठी वाड:मय व संत साहित्यावर पीएच.डी.केलेली होती. त्यांनी काही काळ प्राध्यापकाची नोकरी केल्याचे भाविक किरण नांद्रे यांनी सांगितले. नशीबवानच व्यक्तीच ईश्वरभक्तीदरम्यान वैकुंठवासी होतो, असे काही भाविकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT