उत्तर महाराष्ट्र

मृत महिलेच्या जागी तोतया महिला दर्शवून प्लॉटची विक्री 

सकाळवृत्तसेवा

धुळे : वार (ता. धुळे) येथील प्लॉटची मृत महिलेच्या जागी तोतया महिला उभी करून विक्री केली, शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात व्यवहार झाला असून, या प्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 
येथील गल्ली क्रमांक सहामधील व्यापारी गजानन रामदास चौधरी (वय 58, रा. कोंडाजी व्यायामशाळेजवळ) यांची बहीण प्रतिभा प्रभाकर सोनवणे यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. त्यांच्या नावावर वार शिवारात पाच प्लॉट आहेत. संशयित बाळकृष्ण नीळकंठ चौधरी याच्यासह अन्य संशयितांनी संगनमत केले. प्रतिभा सोनवणे यांच्या जागी दुसरी महिला (नाव समजू शकले नाही) उभी केली. ती प्रतिभा सोनवणे असल्याचे भासविले. तिच्या सहाय्याने प्लॉट संशयित योगेश प्रकाश पाटील यास विक्री केले. नोंदणीकृत खरेदीखतावर अन्य संशयितांनी ओळख असल्याबाबत अंगठा व स्वाक्षऱ्या केल्या, त्यातून फसवणूक केली. 28 मार्च 2012 ला सकाळी अकरानंतर व्यवहार झाला होता. तसेच गजानन चौधरी यांना संशयित सात जणांनी शिवीगाळ, दमदाटी केली. या प्रकरणी गजानन चौधरी यांच्या फिर्यादीनुसार संशयित बाळकृष्ण चौधरी, योगेश पाटील, रुपेश मधुकर गोरे, प्रतिभा सोनवणे यांच्या जागी उभी केलेली महिला, नीळकंठ शिवदास चौधरी, संदीप शिवदास चौधरी, हेमचंद्र नीळकंठ चौधरी यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT