Dhule Municipal Corporation  
उत्तर महाराष्ट्र

धुळे महापौर निवडणूक:शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादीत ताळमेळ नाही

भाजपमधील काही नगरसेवकांची नाराजी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर निवड प्रक्रियेत उलथापालथ घडवू,

निखील सुर्यवंशी



धुळे :
ओबीसी संवर्गाचाच (OBC reservation) महापौर (Mayor) होण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केल्यावर येथे या पदासाठी उद्या शुक्रवारी (ता. १७) ऑनलाइन निवड प्रक्रिया राबविली जाईल. महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ता आहे. त्यात काही नगरसेवकांमध्ये निधी वाटप, कामे मिळत नसल्याच्या कारणावरून खदखद आहे. ही संधी साधत राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने १७ नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करत चाल खेळली. मात्र, आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत ताळमेळ दिसून येत नसल्याने महापौर पदाची निवडणूक सत्ताधारी भाजपला (BJP)सोपी ठरणार असल्याचा निष्कर्ष आहे.


शहरात जळीस्थळी खड्डे, ठिकठिकाणी बंद पथदिवे, साथीच्या आजारांचा कहर पाहता विरोधकांना शह देणे महत्त्वाचे वाटल्याने भाजपने आपल्या गोटातील ५० पैकी ४४ नगरसेवकांना सिल्वासा येथे पर्यटनाला नेले आहे. भाजपतर्फे एकमेव प्रदीप कर्पे यांना उमेदवारी बहाल झाल्याने तेच बहुमताच्या जोरावर महापौर होणार असल्याचे स्पष्ट आहे.


विरोधक लावताहेत गळाला
नागरी सुविधांप्रश्‍नी धुळेकरांची नाराजी हेरून आणि भाजपमधील काही नगरसेवकांची नाराजी लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर निवड प्रक्रियेत उलथापालथ घडवू, अशी चर्चा पेरली. त्यात काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पक्ष, एमआयएम पक्षाने री ओढली. भाजपचे ते १७ नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा करत विरोधकांनी महापौर पदाची निवडणूक भाजपला सोपी नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात पडद्याआडचे चित्र वेगळेच आहे. भाजपनेच विरोधकांमधील काही नगरसेवक गळाला लावत त्यांना शांत बसण्यास सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांचे डावपेच बूम-रँग करण्याचा चंग भाजपने बांधला आहे.


कथनी व करणीत अंतर
एकीकडे ही स्थिती असताना महाआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. ते उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी अधोरेखित झाले. या संबंधित पक्षांमधील इच्छुकांनी स्वतंत्रपणे अर्ज भरले आहेत. महापौर पदाच्या निवडीपूर्वी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व त्यांना इतर साथ देणारे पक्ष एकत्र आल्याचे धुळेकरांच्या ऐकिवात नाही. त्यात आघाडीचे नेतृत्व कोण करणार, मौलिक घोडेबाजारासाठी कोण पुढाकार घेणार आदी प्रश्‍न चर्चेतून ऐरणीवर आहेत. शुक्रवारी महापौर निवड असल्याने बुधवारी रात्रीपर्यंत महाविकास आघाडीतील घटक पक्ष, त्यांना साथ देणारे इतर पक्षीय पदाधिकारी, आमदारव्दयी बैठकीनिमित्त एकत्र आल्याचे ऐकिवात नाही. यात कथनी आणि करणीत अंतर दिसत असल्याने मनपातील सत्ताधारी भाजपला महापौर निवड सोपी असेल, असा अनेक धुळेकरांकडून काढला जाणारा निष्कर्ष नाकारता येणारा नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT