Minister Health MP Dr. Bharti Pawar 
उत्तर महाराष्ट्र

केंद्रीय मंत्री पवारांची आजपासून धुळे,नंदुरबारला जनआशीर्वाद यात्रा

धुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले, की मंत्री डॉ. पवार यांचे आज शेलबारी (ता. साक्री) येथे आगमन होईल.

सकाळ डिजिटल टीम


धुळे/नंदुरबार : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ. भारती पवार (Minister of State for Health MP Dr. Bharti Pawar) आजपासून धुळे आणि नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यातून नव्याने मंत्रिमंडळात (Cabinet) समावेश झालेल्या मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा निघाली असून, यानिमित्त त्या शुक्रवार (ता. २०)पर्यंत दौऱ्यावर असतील.


धुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांनी सांगितले, की मंत्री डॉ. पवार यांचे आज शेलबारी (ता. साक्री) येथे आगमन होईल. सव्वाअकरानंतर पिंपळनेर येथे स्वागत व जनसंवादाचा कार्यक्रम होईल. दुपारी बाराला सामोडे येथे जनसंवाद व अभ्यासिकेचे उद्‌घाटन, दुपारी साडेबाराला मैंदाणे येथे स्वागत, दुपारी पाऊणला दहिवेल येथे ऑक्सिजन प्लांटचे उद्‌घाटन, दुपारी एकला छडवेल-पखरूण, दुपारी सव्वाला साक्री येथे मेळावा, दुपारी अडीचला शेवाळी फाटा, दुपारी तीनला कळंभीर, दुपारी सव्वातीननंतर रायपूरबारी, दुपारी चारला निजामपूर-जैताणे, सायंकाळी पाचला टिटाणे-खोरी, सायंकाळी साडेपाचला छडवेल कोर्डे, तर सायंकाळी सहाला नंदुरबारकडे रवाना होतील.

२० ऑगस्टला ही यात्रा पुन्हा धुळे जिल्ह्यात येईल. यात दुपारी साडेबाराला शिंदखेडा तालुक्यातील धावडे, दुपारी एकला दोंडाईचात जनसंवाद, दुपारी अडीचनंतर विखरण, दुपारी तीनला कामपूर, नंतर मेथी, दुपारी साडेतीनला श्री पेडकाईदेवीचे दर्शन, दुपारी चारला चिमठाणे येथे निवृत्त सैनिकांचा सत्कार, साडेचारला डांगुर्णे, सोंडले, सायंकाळी पाचला धुळे तालुक्यातील सोनगीर, साडेपाचला देवभाणे व कापडणे फाटा, सायंकाळी सहाला नगाव, तेथून धुळे शहरात आगमन होईल. यात्रेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, मनोहर भदाणे, सुभाष देवरे, मोहन सूर्यवंशी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी सहभागी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT