shiv sena-bjp 
उत्तर महाराष्ट्र

गिरीशभाऊ..५०० कोटी गेले कुठे?;शिवसेनेचा सवाल

राज्यात भाजपची सत्ता असतांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीवेळी आणि नंतर पाचशे कोटी रुपये धुळ्याच्या विकासासाठी आणले असे वेळोवेळी सांगितले.

सकाळ वृत्तसेवा


धुळे ः ‘गिरीशभाऊ, ५०० कोटी गेले कुठे, गेले कुठे... खड्ड्यात गेले, खड्ड्यात गेले’, अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेच्या (Shiv Sena) महानगर शाखेच्या आंदोलकांनी महापालिकेचा (Dhule Municipal Corporation) परिसर दणाणून सोडला. देवपूरमधील खड्डे व चिखलमय रस्त्यांप्रश्‍नी शिवसेनेने महापालिकेच्या प्रवेशद्वारात आंदोलन केले. त्याची दखल घेत प्रशासनाने अभियंता कैलास शिंदे यांच्यामार्फत लेखी आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलक (Movment) माघारी फिरले.


राज्यात भाजपची सत्ता असतांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी महापालिका निवडणुकीवेळी आणि नंतर पाचशे कोटी रुपये धुळ्याच्या विकासासाठी आणले, असे वेळोवेळी सांगितले. प्रत्यक्षात संकटमोचक श्री. महाजन यांनी बतावणी केली. पाचशे कोटी निधीच्या तुलनेत धुळे शहरात अपेक्षित विकास झालेला दिसत नाही. देवपूर भाग तर खड्डयात गेला आहे. त्यामुळे ‘पाचशे कोटी गेले कुठे, खड्ड्यात गेले’, अशी घोषणा दिल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, मनोज मोरे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.



मनपा प्रशासनाकडून दखल
भूमिगत गटार योजनेच्या कामामुळे देवपूरमधील रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. एमजेपी, महापालिकेकडे तक्रार करूनही उपयोग झाला नाही. प्रभाग पाचमध्ये, तसेच इतर प्रभागात शंभर टक्के करवसुली होऊनही रस्ते खराब का?, पाणी नियमित का येत नाही?, इतर सुविधा का पुरविल्या जात नाहीत, असे प्रश्‍न आंदोलकांनी केले. या आंदोलनाची दखल घेत आयुक्तांनी अभियंता शिंदे यांना आंदोलनस्थळी पाठविले. त्यांच्यापुढे महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील यांनी संतप्त देवपूरवासीयांची कैफियत मांडली. तत्काळ निविदा प्रक्रिया राबवून रस्ते दुरुस्तीची मागणी केली. त्यावर अभियंता शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य करत लेखी आश्वासन देताना सांगितले, की १५ दिवसांत खराब रस्ते दुरुस्त केले जातील. नंतर नवीन रस्ते तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले जाईल.

आंदोलनात हे होते सहभागी..

या भूमिकेनंतर महानगरप्रमुख पाटील व जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाची सांगता झाली. सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, लोकसभा संघटक महेश मिस्तरी, उपजिल्हा प्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मोरे, युवा सेना सहसचिव पंकज गोरे, विधानसभा संघटक डॉ. सुशिल महाजन, समन्वयक गुलाब माळी, महिला आघाडी संघटक संगीता जोशी, अरुणा मोरे, जयश्री वानखेडकर, नगरसेविका जोत्स्ना पाटील, उपमहानगर प्रमुख नंदलाल फुलपगारे, पुरुषोत्तम जाधव, संजय वाल्हे, ललित माळी, संदीप चव्हाण, आबा भडागे, मच्छिंद्र निकम, योगेश मराठे, कुणाल कानकाटे, रवींद्र माळी, भटू गवळी, संजय पाटील, केशव माळी, दिनेश चौधरी, दिगंबर चौधरी, शुभम मतकर, संदीप चौधरी, अमोल ठाकूर, शुभम रणधीर, अक्षय पाटील आंदोलनात सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: मुंबईत भरतीचा इशारा; अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Intel Layoffs 2025 : ‘इंटेल’ने घेतला मोठा निर्णय! यावर्षात तब्बल २४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार

Asia Cup 2025 स्पर्धेच्या तारखा अन् ठिकाण ठरलं! ACC अध्यक्षांची घोषणा, पण भारत-पाकिस्तान सामना...

Crime: मेव्हणीवर एकतर्फी प्रेम, साढूवर संताप; वेड्या दाजीनं दोन चिमुकल्यांना शिकार बनवलं अन्...; संतापजनक कृत्य

Latest Maharashtra News Updates : पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT