डॉ. रवी वानखेडकर 
डॉ. रवी वानखेडकर  
उत्तर महाराष्ट्र

'आयएमए'च्या डाॅक्टरांची रविवारपासून भारत यात्रा 

निखिल सूर्यवंशी

धुळे : देशात प्रथमच रुग्ण आणि डॉक्‍टरांचे नाते, सुसंवाद वृद्धिंगत होण्यासाठी, तसेच राष्ट्रीय वैद्यकीय आयोग, क्‍लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्‍टला विरोधासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे रविवारपासून (ता. 25) भारत यात्रा निघते आहे. याअंतर्गत 25 मार्चपर्यंत सर्व राज्यांसह प्रत्येक जिल्ह्यात सायकल यात्रा काढून प्रबोधनासह रुग्णांशी संवाद साधला जाईल, अशी माहिती "आयएमए'चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांनी आज दिली. 

कन्याकुमारी येथून रविवारी सकाळी डॉ. वानखेडकर यांच्या हस्ते व नेतृत्वात भारत यात्रेला सुरवात होईल. या दिवशी केरळ, तमिळनाडू, चंडीगड, द्वारका, जयपूर, आग्रा, इंफाळ आदी नऊ ठिकाणांहून व त्या- त्या भागात "आयएमए'चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पद्‌मश्री डॉ. मार्तंड पिल्लई, डॉ. विनय अग्रवाल, डॉ. अरुल्ह राज, डॉ. के. विजयकुमार, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. परमजितसिंग बक्षी, राष्ट्रीय महासचिव डॉ. आर. एन. टंडन आदींच्या नेतृत्वात यात्रा काढली जाईल. डॉ. वानखेडकर सर्व राज्यांतील यात्रेत उपस्थित असतील. 

जिल्ह्यापर्यंत सायकल यात्रा 
प्रत्येक राज्यात "आयएमए'ची राज्य संघटना सायकल यात्रा सुरू करेल. यापाठोपाठ प्रत्येक जिल्ह्यातील शाखा सायकल यात्रा काढेल. देशभरातील "आयएमए'च्या 1750 शाखा यात्रेत सहभागी असतील. या संदर्भात तारखेनिहाय नियोजन झाले आहे. डॉक्‍टर आणि रुग्णांमध्ये दुरावत चाललेले अंतर कमी करणे, सुसंवाद वाढविणे, वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संवाद वाढविणे, या कार्यात सायकलिस्ट संघटना, विविध सेवाभावी संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश व सहभाग वाढविण्यासाठी ही यात्रा आहे. त्यात पर्यावरण रक्षणासाठी सायकल रॅलीद्वारेही संदेश दिला जाईल. नियोजनानुसार प्रत्येक शाखेच्या कार्यालयासमोर मंडप टाकून रुग्णांशी संवादाचा कार्यक्रम घेतला जाईल. 

दिल्लीत 25 ला महापंचायत 
यात्रेतील पंचवीस हजारांहून अधिक डॉक्‍टर, वैद्यकीय विद्यार्थी, "आयएमए'च्या प्रत्येक शाखेचे अध्यक्ष व सचिव, इतर सेवाभावी संस्था व संघटनांचे प्रतिनिधी यात्रेच्या समारोपानिमित्त 25 मार्चला दिल्लीत एकत्र येतील. तेथे इंदिरा गांधी स्टेडियममध्ये सकाळी दहाला "आयएमए' महापंचायत होईल. तीत विविध महत्त्वाचे ठराव होतील. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला "आयएमए' विरोध करत आहे. या आयोगामुळे सर्वसामान्य जनतेचे नुकसान होणार असून वैद्यकीय शिक्षण महागणार आहे. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा फायदा होणार असून, या सर्व गोष्टींची झळ प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे गरिबांना बसेल. त्याविषयी समाजाला माहिती व्हावी म्हणूनही यात्रा काढली जात असल्याचे डॉ. वानखेडकर यांनी सांगितले. 

धुळेकरांतर्फे शुभेच्छा 
डॉ. वानखेडकर यांच्या पुढाकाराने देशात प्रथमच ही यात्रा निघते आहे. समाजहितासाठी डॉक्‍टर रस्त्यावर उतरत आहेत. त्या अनुषंगाने धुळे "आयएमए'तर्फे आज सकाळी सहाला सर्व सदस्य डॉ. वानखेडकर यांना शुभेच्छा देण्यासाठी "आयएमए' हॉलजवळ एकत्र आले, अशी माहिती शाखाध्यक्ष डॉ. संजय गोरे, कार्याध्यक्ष डॉ. नीता हटकर, सचिव डॉ. पराग उपकारे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT