Dhule Zilla Parishad) Dhule Zilla Parishad)
उत्तर महाराष्ट्र

धुळे जि.पतील वैयक्तिक मान्यतेच्या सर्वच आदेशांना स्थगिती

समितीने केलेल्या चौकशीत गंभीर प्रकार समोर आले आहेत

सकाळ वृत्तसेवा



धुळे : जिल्हा परिषदेच्या (Dhule Zilla Parishad) माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत (Office of the Secondary Education Officer) वैयक्तिक मान्यता देताना झालेल्या अनियमिततेची चौकशी (Inquiry) अंतिम टप्प्यात आली आहे. प्रत्येक फाइलची चाचपणी करण्यासह नियमित कामकाज सांभाळण्यात येत आहे. यामुळे चौकशीला विलंब होत असल्याची माहिती शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी (Deputy Director of Education Nitin Upasani) यांनी दिली. (suspension all personal approval orders in dhule zilla parishad )


माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयांतर्गत वैयक्तिक मान्यता काही तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने दिल्या आहेत. याप्रकरणी फेब्रुवारीत शिक्षणाधिकारी कार्यालयातील शालार्थ आयडीचे प्रस्ताव व नस्ती, वैयक्तिक मान्यताचे प्रस्ताव व नस्ती, वेतन पथक कार्यालयातील वैद्यकीय बिल, थकीत बिलांसह इतर आवश्यक कागदपत्रे जप्त केली आहेत. या फायलींमध्ये मोठा घोळ असल्याचे समोर आले. याबाबत संपूर्ण चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. समितीने केलेल्या चौकशीत गंभीर प्रकार समोर आले आहेत.

चौकशीला विलंब
चौकशी समितीतील सदस्यांना नियमित कामकाजाबरोबरच चौकशीचे काम सांभाळावे लागत आहे. यामुळे चौकशीला विलंब झाला आहे. आता केवळ ८० फायलींची अंतिम पडताळणी बाकी आहे. येत्या आठ दिवसांत ही पडताळणी पूर्ण झाल्यावर चौकशी समितीचा अहवाल येणे अपेक्षित आहे. या अहवालाच्या आधारे चौकशीत दोषी आढळणाऱ्या‍ कर्मचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे, तर दोषी अधिकाऱ्यांवरील कारवाईचा प्रस्ताव पुणेस्थित शिक्षण आयुक्त कार्यालयात सादर करण्यात येईल, अशी माहिती उपसंचालक उपासनी यांनी दिली.



आमिषाला बळी पडू नये
वैयक्तिक मान्यतांची चौकशी सुरू असेपर्यंत सेवा सातत्याचे आदेश न देण्याचे आदेश दिले होते. तरीही सेवा सातत्याचे आदेश देण्यात आले. या सर्वच आदेशांना स्थगिती देण्यात येत आहे. चौकशी सुरू असताना वैयक्तिक मान्यता आणून देण्याच्या भूलथापा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालकांना कुणी देत असेल तर आमिषाला बळी पडू नये. चौकशीच्या अंतिम निवाड्यानंतर मान्यतेबाबत योग्य कार्यवाही होईल, अशी माहिती उपसंचालक उपासनी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: आयएएस झाले तरी आयुष्याची परवड थांबली नाही; तुकाराम मुंढे- कर्जबाजारी बापाचा निर्भीड पुत्र

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे प्रयत्न- ममता बॅनर्जी

Strait of Hormuz: 'होर्मुज'साठी ३५ देश एकत्र! ट्रम्प यांची दादागिरी चालणार नाही; ब्रिटनचा पुढाकार, तेल-गॅसचा पुरवठा होणार सुरळीत

SCROLL FOR NEXT