उत्तर महाराष्ट्र

तर्ऱ्ह नातवाने पैशांसाठी आजोबांनाच मारले 

निखिल सूर्यवंशी

धुळे : शहरातील असंख्य लहानगी मुले, तरुणाई नशेच्या आहारी गेल्याची माहिती काही अभियंते, व्यावसायिक आणि जागरूक सामाजिक कार्यकर्त्यांनी आज "सकाळ'ला दिली. यात मुस्लिमबहुल हजारखोली भागात 13 वर्षांच्या तर्ऱ्ह नशेबाज नातवाने पैशांसाठी आजोबांनाच मारल्याची धक्कादायक माहिती सामाजिक कार्यकर्त्याने दिली. फर्निचरसाठी वापरात येणारी पॉलिश (वॉर्निश), "व्हायटनर'संबंधी "थिनर'ला नशेबाजांकडून मागणी असल्याचे सांगण्यात आले. 


नोटाबंदीनंतर मंदीच्या गर्तेत सापडलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीयदृष्ट्या अस्थिर धुळे शहरात असंख्य लहानगी मुले, तरुणाई पुरती नशेच्या आहारी गेल्याचे स्पष्ट झाले आहे. रोजगाराच्या अभावासह प्राथमिक शिक्षणाचा, गुणवत्तेचा पाया कच्चा राहात असल्याने, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण नावालाच होत असल्याने ही गत ओढवत असल्याचा निष्कर्ष मांडला जातो. 

नशेच्या पदार्थांची वाढती यादी 
मुस्लिमबहुल भागासह देवपूर आणि शहरातील अल्पविकसित भागात नशेखोरीचे लोण पोहोचले आहे. नशेबाज मुले, तरुण स्वस्तातील आणि सहज उपलब्ध होणारे स्टीक फास्ट, व्हायटनर व थिनर, फेव्हीबॉण्ड- एसआर, रिफीलमधील शाई, पेट्रोल, फर्निचरची पॉलिश (वॉर्निश), पंक्‍चर काढण्याचे सोल्यूशन, फ्रेंच पॉलिशचा नशेसाठी मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. असे पदार्थ, वस्तू सरासरी दहा ते पन्नास रुपयात उपलब्ध होतात. ते हातरूमालास लावायचे आणि नाका- तोंडावाटे हुंगायचे, अशी नशेची पद्‌धत आहे. त्यामुळे आनंद मिळतो, त्याशिवाय राहावात नाही, अशी नशेबाजांची स्थिती आहे. तसेच पाव घेऊन त्याला व्हिक्‍स वेपोरब किंवा आयोडेक्‍स लावून त्याची नशा करायची किंवा चहात बुडवून ही नशा केल्याने निराळाच आनंद मिळतो या भावनेतून ते या प्रकाराच्या आहारी गेले आहेत. 

हजारखोलीतील चिंतेची घटना 
एकीकडे ही स्थिती असताना नशेसाठी पैसे मिळावेत म्हणून भीक मागणे, घरात किंवा वसाहतीत वयानुरूप चोऱ्या करण्याकडे मुलांसह तरुणांचा कल वाढला आहे. हजारखोली भागात सामान्य कुटुंबातील 13 वर्षाच्या मुलाला मालेगावहून आलेल्या काही मुलांनी नशेची सवय लावली. पीडित मुलाची आई धुणीभांडी करते, तर वडील वाहनचालक आहेत. तो शाळेत जात नाही. त्याला सात महिन्यांपूर्वी स्टीक फास्टसह अन्य पदार्थांच्या नशेची सवय जडली. त्यासाठी त्याने रहिवासी भागात भांडी व पैसे मिळू शकतील, अशा वस्तू चोरी केल्या. त्यातून त्याला हटकल्यानंतर त्याने नशेसाठी पैसे मिळावे म्हणून थेट आजोबांनाच मारले. या प्रकारामुळे त्या मुलाचे पालक भयभीत झाले. त्याला सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून बालगृहात दाखल करण्याचा विचार पालकांनी केला. मात्र, बदनामीच्या धाकाने आणि मुलगा जिवाचे काही करून घेईल या भीतीने पालकांनी त्याला बालगृहात दाखल केलेले नाही. या प्रकारांमुळे "कुठल्या दिशेला चाललेय धुळे', असे म्हणण्याची वेळ आली आहे. 

अड्ड्यांवर "वॉच' हवा 
पोलिस अधीक्षक कार्यालयाशेजारील जे. आर. सिटी हायस्कूलमागील खुली जागा, कॉलनी भागातील किंवा आडोशाची मोकळी पटांगणे, सुरक्षिततेची उपाययोजना नसलेली व्यापारी संकुले, शॉपिंग कॉम्प्लेसची गच्ची, दुकाने बंद झाल्यानंतर तळमजल्यातील पार्किंगची किंवा खुली जागा आदी नशेबाजांचे अड्डे झाले आहेत. शहरात मालेगाव रोडवरील कोरकेनगर भागात नव्याने झालेल्या शंभर फुटी रस्त्यावरील अड्ड्यांना नशेबाजांची विशेष पसंती आहे. अशा अड्ड्यांवर पोलिसांसह शासकीय यंत्रणेने "वॉच' ठेवण्याची गरज आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT