Dhule Zilla Parishad Dhule Zilla Parishad
उत्तर महाराष्ट्र

धुळे जि. प. आरक्षणाचे रिव्ह्यू पीटीशन फेटाळले

सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करीत पन्नास टक्क्यांवर आणले होते.

सकाळ डिजिटल टीम

कापडणे : धुळे जिल्हा परिषदेच्या (Dhule Zilla Parishad)आरक्षणासंदर्भात (Reservation) माजी सभापती अरविंद जाधव, बापू खलाणे व सहकाऱ्यांनी दाखल केलेले रिव्ह्यू पीटीशन (Review Petition) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी (ता. २८) फेटाळले. यामुळे राज्यात आरक्षणावरून गाजत असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्रकरणावर पडदा पडला आहे. लवकरच निवडणुकीचा (Election) मार्ग मोकळा होणार आहे.

( dhule zilla parishad reservation review petition supreme court rejected)

धुळे जिल्हा परिषदेतील पंधरा गटांतील निवडणुका नव्याने घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मार्चला दिले होते. निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे ७३ टक्के आरक्षण झाले होते. याबाबतीत बोरकुंडचे प्रकाश पाटील यांनी याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द करीत पन्नास टक्क्यांवर आणले होते. यामुळे ओबीसी प्रवर्गातील पंधरा जागांवर गदा आली. या निकालावर भाजपचे अरविंद जाधव, बापू खलाणे, राम भदाणे यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पीटीशन दाखल केले होते. त्यावर शुक्रवारी (ता.२८) सुनावणी होऊन ते फेटाळल्याची माहिती राष्र्टवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी सभापती किरण पाटील यांनी दिली. मात्र, रिपीटीशनवर १ जूनला सुनावणी होणार असल्याचे माजी सभापती जाधव यांनी सांगितले.

निवडणुकीचा मार्ग मोकळा
धुळे जिल्हा परिषदेची निवडणूक ८ जानेवारी २०२० ला झाली. या निवडणुकीत भाजपने ५६ जागांपैकी ३९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, या निवडणुकीत आरक्षणाबाबत बोरकुंड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी आक्षेप घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने विशेष नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षण कमी केले. हे ७३ टक्केवरील आरक्षण पन्नास टक्‍क्‍यांवर आले आहे. धुळे तालुक्यातील ११ आणि शिंदखेडा तालुक्यातील चार गट सर्वसाधारण जागेसाठी आले आहेत. म्हणजे या १५ गटांतील १५ जागांसाठी आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी नव्याने निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.


या गटांमध्ये होणार निवडणुका
कापडणे, नेर, कुसुंबा, लामकानी, रतनपुरा, नगाव, फागणे, बोरकुंड, बोरविहीर, शिरूड, नरडाणा, बेटावद, मालपूर व खलाणे या पंधरा गटांमध्ये व ३० गणांमध्ये नव्या निवडणूक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT