live
live 
उत्तर महाराष्ट्र

जिल्ह्यातील अडीचशे गावात 57 टॅकर 

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः आठ तालुक्‍यात दृष्काळ सदृश्‍यस्थितीमुळे टॅकरची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील अडिचशेवर गावात पाणीटंचाई असून 57 टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे. दरम्यान टंचाई निकषानुसार चार दिवसात 93 गावात पथकाने प्रत्यक्ष पाहणी करुन पिक परिस्थितीची माहीती घेतली. 

जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे दृष्काळी भागाचा दौरा करणार आहेत. काल सिन्नर तालुक्‍यात आणखी 4 टॅकरची मागणी झाली. सिन्नर तालुक्‍यात टंचाई स्थिती तीव्र होत असून 17 टॅकरने पाणीपुरवठा सुरु आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चांदवड, नांदगाव, मालेगाव, बागलाण व देवळा तालुक्‍याचा दौरा केला. दौऱ्यात नागरिकांच्या तीव्र भावना भावनाचा सामना करावा लागला होता. टॅकरच्या वाढत्या मागणीची दखल घेत, शासनाने मंत्र्यांना दृष्काळी भागाच्या पाहणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार तालुक्‍यातील दृष्काळी गावाचे पर्जन्यमान, आद्रता, पीक परिस्थिती आदीची कृषी, भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून तांत्रीक माहीती संकलनाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्यातील 93 गावात भेटी देउन टंचाई माहीती संकलन सुरु केले आहे. 

सत्ताधारी विरोधात आक्रेश, पाणी तापले 
जिल्ह्यात एका बाजूला दृष्काळस्थिती गंभीर बनली असतांना दुसरीकडे जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरु झाल्याने त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. जायकवाडी धरणातील आकडेवारीचा घोळा विरोधात चौकशीच्या मागण्या सुरु झाल्या आहेत. विविध राजकिय पक्षानी सत्ताधारी भारतीय जनता पक्षा विरोधात आक्रोश सुरु केला आहे. त्यामुळे गोदावरीचे पाणी तापायला सुरुवात झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Rally Pune: "तुम्ही लवकरच देशातील पहिल्या बुलेट ट्रेनमधून प्रवास कराल"; PM मोदींनी पुणेकरांना दिली गॅरंटी

Latest Marathi News Live Update : पुण्यातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Aamir Khan : आणि 'महाराष्ट्र बंद' ने पालटलं आमिरचं नशीब

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीला बसला पहिला धक्का! पुनरागमन करणारा पृथ्वी शॉ स्वस्तात बाद

SCROLL FOR NEXT