residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर किसान सभेचे 1 जूनपासून राज्यभर आंदोलन 

सकाळवृत्तसेवा

नाशिक- शेतकरी संपाचा 1 जूनला द्वितीय वर्धापन दिन आहे. या दिवशी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर प्रत्येक तहसील कार्यालयासमोर किसान सभेतर्फे जोरदार मोर्चे काढण्याचा निर्णय किसान सभेने घेतला आहे. 
अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य कौन्सिलची बैठक 5 मेस परळीत झाली. त्यात हा निर्णय झाला. राज्यातील भयावह दुष्काळ, कर्जमाफी, शेतमालाचे भाव, पीकविमा, जमिनीचे हक्क, शेतकरी पेन्शन, सिंचन, रेशन, या व इतर स्थानिक मागण्यांसाठी हा मोर्चा असेल. मोर्चात समविचारी शेतकरी संघटनांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. 

किसान सभेच्या सर्व जिल्हा, तालुका, तसेच गाव कमिट्यांनी या संदर्भात तातडीने नियोजन करून कामाला लागावे. हजारोंच्या संख्येने पत्रके, पोस्टर काढावीत, गावसभा घ्याव्यात, व्यापक तयारी करावी व 1 जूनचे आंदोलन अभूतपूर्व ताकदीने यशस्वी करावे, असे आवाहन किसान सभेच्या राज्य कौन्सिलने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT