live
live 
उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या खाद्यपदार्थांचे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक

सकाळवृत्तसेवा

नाशिक : नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील आदिवासी महोत्सवांतर्गत महाराष्ट्रातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांची भुरळ केंद्रीय मंत्र्यांना पडली. या महोत्सवातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी कौतुक करत फेब्रुवारी 2019 मध्ये सूरजकुंड येथे होणाऱ्या 2019 च्या महोत्सवासाठी आमंत्रण दिले. 

सेंट्रल हॉल येथे भरलेल्या या महोत्सवात महाराष्ट्रामधील महिला बचतगट व हस्त कलाकारांनी आपला सहभाग नोंदविला आहे. 22 राज्यांतून या कार्यक्रमासाठी सुमारे हजार कलाकार उपस्थित आहेत. या वेळी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुण्याचे प्रतिनिधी, व्यवस्थापक यांनी सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय आदिवासी विकासमंत्री ज्युएल ओराम आणि इतर मंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यातील महिला बचतगटांच्या महिलांनी तयार केलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांच्या मेजवानीचा आस्वाद घेतला. प्रथमच केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांची चव चाखत बचतगटांच्या कामाचे आणि खाद्यपदार्थांचे कौतुक केले. केंद्रीय पर्यटन विभागाने भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT