live
live 
उत्तर महाराष्ट्र

गणराय निरोपाची 12 तास मिरवणूक, थिरकली तरुणाई,गुलाल-डॉल्बीवर फुली 

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः नाशिकच्या प्रसिद्ध ढोल-ताश्‍यांच्या दणदणाटावर थिरकणाऱ्या तरुणाईने बुद्धीची देवता गणरायाला काल (ता. 23) अनंत चतुदर्शीला जड अंतःकरणाने निरोप दिला. यंदाच्या मिरवणुकीत गुलालाची उधळण, डॉल्बी-डीजेवर फुली मारण्यात आली होती. पण तरीही दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांचे पुत्र नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या मिरवणुकीत डीजे दणाणला. तपोवनामध्ये मद्यपी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली असून पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

वाकडी बारवपासून दुपारी बाराला पालकमंत्री गिरीश महाजन, प्रधान सचिव विनिता सिंगल, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार प्रा. देवयानी फरांदे, श्री. सानप, माजी आमदार वसंत गिते, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, नगरसेवक गजानन शेलार, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, माजी महापौर विनायक पांडे आदी उपस्थितीत मुख्य सार्वजनिक मिरवणुकीला सुरवात झाली.

पालकमंत्र्यांच्या सोबत कैलास मठाचे प्रमुख स्वामी संविदानंद सरस्वती यांनी महंत भक्तीचरणदास आणि इतरांच्या उपस्थितीत ढोलवादन करताच गणेश भक्तांमध्ये उत्साहाला उधाण आले होते. पालकमंत्र्यांच्या समवेत महापालिका आयुक्तांनी धरलेला ठेका हेही मिरवणुकीचे आकर्षण ठरले होते. ढोल-ताशा वादन करणाऱ्या तरुणाईबरोबरच सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी फेटे, गांधी टोप्या परिधान केल्या होत्या. भगव्या रंगाच्या टोप्यांवर "गणपती बाप्पा मोरया' अशी अक्षरे होती. मिरवणुकीत यंदा वीस सार्वजनिक मंडळाचा सहभाग राहिला. रात्री बाराला मेहेर चौकात पोलिसांनी मंडळांचे वाद्य वादन बंद केले. 

बादशाही कॉर्नरवर तासाभराने पहिले मंडळ 
मिरवणुकीतील पहिल्या मानाचे महापालिका कर्मचाऱ्यांचे मंडळ दुपारी एकला बादशाही कॉर्नरपर्यंत पोचले. नाशिकचा ढोल आणि काचेच्या चिपळ्यांच्या ठेक्‍यावर ढोलवादकांनी धरलेला ठेका हे मंडळाच्या मिरवणुकीचे आकर्षण राहिले. रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या चांदीच्या गणेशाचे सिंहाच्या रथाचे सारथ्य लोकमान्य टिळक करताहेत असा देखावा होता. माऊली प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक आणि भगव्या ध्वज नाचवणाऱ्या तरुणी मिरवणुकीच्या अग्रभागी होत्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT