residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

गुड न्युज! नव्या वर्षातच मिळणार पहिले आवर्तन....

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव ः समाधानकारक पावसामुळे यावर्षी तालुक्‍यासह कसमादे परिसरातील धरणे, तलाव, पाझर तलाव, विहिरी ओव्हरफ्लो आहेत. नद्यांना अजूनही कमी प्रमाणात का होईना पाणी आहे. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विहिरींना मुबलक पाणी असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता रब्बी पिकावर आहेत. 

यावर्षी रब्बीच्या क्षेत्रात अधिक वाढ होणार आहे. उपलब्ध असलेले पाणी पाहता विविध धरणांमधून पहिल्या आवर्तनाची गरज नव्या वर्षातच पडू शकेल.  रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला. तब्बल 25 वर्षांनंतर सरासरीच्या 200 टक्‍क्‍यांपर्यंत पावसाने हजेरी लावली. अतिवृष्टी व अवकाळी पावसाने हातात आलेले पीक वाया गेले. अतिपावसामुळे कधीही न भरणारे तलाव, पाझर तलाव व लहान धरणे प्रथमच ओसंडून वाहू लागली. खरीप वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बीच्या अपेक्षा आहेत.

   गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्‍यात जेमतेम नऊ ते दहा हजार हेक्‍टर एवढीच पेरणी झाली होती. यावर्षी ती तीन ते चारपटीने वाढणार आहे. रब्बीचे क्षेत्र विहिरींना असलेले पाणी व धरणातून मिळणारे आवर्तन यावरच अवलंबून असते. गेल्या वर्षी चणकापूर धरणातून सिंचनासाठी एकमेव आवर्तन मिळाले होते. उर्वरित धरणातील पाणी पिण्यासाठी राखून ठेवले होते. यावर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यातही धरणे, तलाव, पाझर तलाव, विहिरी, विविध पाणीयोजनांचे साठवण तलाव ओव्हरफ्लो आहेत. हे पाणी आणखी दीड महिने सहज पुरेल. मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तळवाडे साठवण तलावात 86 दशलक्ष घनफूट पाणी असून, हे पाणी दोन महिने पुरणार आहे. पिण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत सहज पाणी पुरेल एवढा साठा सर्वत्र शिल्लक आहे. रब्बीचे क्षेत्र वाढणार असले, तरी विहिरींना मुबलक पाणी असल्याने किमान दोन महिने सिंचनाच्या आवर्तनाची गरज पडणार नाही. परिणामी, कसमादेतील सर्व धरणांमधील पहिले आवर्तन नव्या वर्षातच सोडले जाऊ शकेल. 

चणकापूर धरणात दोन हजार 427, हरणबारीत एक हजार 166, केळझर 572, नागासाक्‍या 397, पुनंद एक हजार 306, तर गिरणा धरणात 18 हजार 500 दशलक्ष घनफूट साठा आहे. ही सर्व धरणे ओव्हरफ्लो असून, शंभर टक्के भरली आहेत.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

ढिंग टांग : महाशक्तीचे महावाटप...!

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 03 मे 2024

आंबा : उन्हाळ्याचा अनभिषिक्त राजा

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT