live
live 
उत्तर महाराष्ट्र

जिल्हा खो-खो स्पर्धेत शासकीय कन्या विद्यालयाला दुहेरी मुकुट 

सकाळवृत्तसेवा

  नाशिक : जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व नाशिक जिल्हा खो-खो संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या सतरा वर्षाआतील ( मनपा ) मुलींच्या  खो-खो स्पर्धेत शासकीय कन्या विद्यालयांच्या खेळाडूंनी चौदा व सतरा वर्षाखालील गटात वर्चस्व राघत दुहेरी मुकूट संपादन केला.

 अंतिम सामना गत विजेता र ज चव्हाण हायस्कूल नाशिकरोड व जिल्हा परिषदेची शासकीय कन्या शाळा या दोन संघामध्ये चुरशीचा सामना झाला . मध्यंतराला ५ विरुद्ध ३ अशी २ गुणांची आघाडी शासकीय कन्या शाळेकडे होती . अखेर तिच आघाडी निर्णायक ठरली . हा सामना शासकीय कन्या शाळाने ८ विरुद्ध ५ अश्या ३ गुणांनी जिंकून विभागीय खो-खो स्पर्धेसाठी पात्र ठरले . 
     

   विजेत्या संघाकडून विद्या मिरके , रुपाली मेढे ,नामिषा भोये ,सीता दिवा यांची अष्टपैलू कामगिरी निर्णायक ठरली . पराभूत संघाकडून अनुष्का मानकर , कीर्ती खाडे यांची चांगली खेळी आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकली नाही . 

        चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात विक्रमी ४६ संघानी सहभाग नोंदवला होता . आपल्या पहिल्या सामन्यापासून शासकीय कन्या शाळाने आपला दबदबा निर्माण केला होता . पहिल्या सामान्यांपासून अंतिम फेरी पर्यंत सर्व सामने त्यांनी डावाच्या फरकाने जिंकले . अंतिम फेरीत विजेत्या संघाची निशा वैजल हिच्या  नाबाद ७ मिनिटाच्या खेळीने सामना कमालीचा एकतर्फी करून टाकला . तिच्या या खेळीला कर्णधार मनीषा पडेर सात गडी , सोनाली पवार व वृषाली भोये प्रत्येकी ३ गडी , दीदी ठाकरे , शिवानी लहारे  , दीपिका बोरसे , सोनाली हडळ , नर्मदा भोवर यांनी विजेत्या संघाला साजेसा खेळ केला .  या दोन्ही गटात जिल्हा परिषदेची शासकीय कन्या शाळा प्रथमच विभागीय खो-खो स्पर्धेत नाशिक मनपाचे प्रतिनिधित्व करणार आहे . 
       

आनंद निकोतन,एकलव्य स्कूलचा सामना

    सतरावर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत ४२ संघ सहभागी झाले होते . अंतिम सामना आनंद निकेतन व एकलव्य रेसिडेन्शीअल स्कूल या दोन संघामध्ये होणार आहे. तर १४ वर्षाखालील मुलांच्या गटात ४० संघ सहभागी झाले होते . अंतिम सामन्यात छत्रपती शिवाजी विद्यालय मखमलाबादने आनंद निकेतन शाळेचा पराभव करून विभागीय स्पर्धेत स्थान मिळवले . 
     

 १९ वर्षाखालील मुलांमध्ये एल व्ही एच महाविद्यालय पंचवटीने के टी एच एम कॉलेज चा तर मुलींमध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय मखमलाबाद ने  के टी एच एम कॉलेज पराभव करून विभागीय खो-खो स्पर्धेसाठी नाशिक मनपाचे प्रतिनिधित्व करतील .
*गीतांजली सावळे या शासकीय कन्या विद्यालय विजेत्या संघाच्या प्रशिक्षक आहेत, मुख्याध्यापिका कविता साठे आणि त्यांच्या सर्व गुरुजनांनी मुलींचे कौतुक केले
.
जिल्हा परिषदेचे योगदान
आदिवासी मुलींच्या खेळाला बळ मिळावे म्हणून नाशिक जिल्हा परिषदेने शासकीय कन्या शाळेत शिक्षणाची सोय केली, त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते यांनी पुढाकार घेतला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण सभापती यतीन पाटील, सभापती मनीषा पवार, सुनीता चारोस्कर, अपर्णा खोसकर, शिक्षणाधिकारी डॉ वैशाली झनकर, नितीन बच्छाव यांनी मुलींचे अभिनंदन केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad T20 World Cup 2024 : टीम इंडियाची घोषणा! वर्ल्ड कप जिंकण्याची जबाबदारी 'या' मावळ्यांच्या खांद्यावर, जाणून घ्या संपूर्ण संघ

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

UK Video: हातात तलवार घेऊन तो लंडनच्या रस्त्यावर फिरत होता, 2 पोलिसांसह अनेकांना भोसकले, पाहा व्हिडिओ

Lok Sabha Election: ठाकरे गटाला खिंडार! वैशाली दरेकरांनी उमेदवारी अर्ज भरताच ठाकरे गटातील धुसफूस बाहेर

Latest Marathi News Live Update : भाजप पुन्हा सत्तेत आल्यास ते राज्यघटना फेकून देतील, राहुल गांधी यांचा आरोप

SCROLL FOR NEXT