उत्तर महाराष्ट्र

रोख पैसे द्या, मगच द्राक्षे घ्या! 

महेंद्र महाजन

नाशिक - तंत्रज्ञानाची जोड देत बहाद्दर शेतकऱ्यांनी शेतमाल उत्पादनवाढ केली; पण विक्रीकौशल्यात कमी पडल्याने त्यांना काही वेळा फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. आजवरच्या प्रत्येक हंगामात व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या फसवणुकीचा धडा घेत शेतकऱ्यांनी द्राक्षे रोखीने विकण्याची नवी चळवळ उभी केलीय. ठकविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी ग्रामसभांमध्ये ठराव होऊ लागलेत. राजकीय नेत्यांना चार हात दूर ठेवत शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

शेतमाल रोखीने विकण्याची चळवळ उभी करण्यात द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. निफाड, दिंडोरी आणि चांदवड तालुक्‍यांत चळवळीचे लोण पसरले आहे. आतापर्यंत उगाव, शिवडी, साकोरे, सारोळे खुर्द, बेहेड, खडकमाळेगाव, वनसगाव, रानवड (ता. निफाड) आणि चिंचखेड (ता. दिंडोरी) येथील ग्रामसभांमधून आधारकार्ड अथवा पॅनकार्डद्वारे ओळख पटल्याखेरीज व्यापाऱ्याला द्राक्षे विकायची नाहीत, असे धोरण स्वीकारले गेले. हे कमी काय म्हणून रोख पैसे असल्याखेरीज सौदा करायचा नाही, धनादेश दिल्यावर वापसी, कपात करून पैसे स्वीकारायचे नाहीत, याही बाबींचा ठरावात समावेश करण्यात आला आहे. 

बांधावर 90 टक्के विक्री 
द्राक्षपंढरी म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षांचे क्षेत्र पावणेदोन लाख एकरांच्या पुढे पोचले आहे. एकरी सर्वसाधारणपणे दहा टन उत्पादन शेतकरी घेतात. त्यातील पाच ते दहा टक्के माल शेतकरी स्वतः विकतात. उरलेल्या 90 टक्के द्राक्षांची विक्री बांधावर होते. शेतकऱ्यांकडून निर्यातीप्रमाणेच देशातंर्गत द्राक्षे पाठवण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्‍चिम बंगालसह बांगलादेशातील व्यापारी जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मुक्कामी येतात. बागलाण तालुक्‍यात नोव्हेंबरपासून अन्‌ डिसेंबरच्या अखेरीनंतर जिल्ह्यातील उर्वरित भागांत खरेदीचा हंगाम सुरू होतो. हे सारे व्यवहार अर्थात तोंडी असतात. त्याचा कागदोपत्री काहीच पुरावा शेतकऱ्यांकडे नसतो. त्यामुळे पोलिसांकडे धाव घ्यायची म्हटले, तरी कायदेशीर अडचण येते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वर्षाला 10 टक्के व्यापारी फसवणूक करतात. त्यात ठरलेल्या भावानुसार पैसे न देणे, द्राक्षे खरेदी करून पैसे न देता पोबारा करणे, एक ते दोन टक्के परत पाठवणे, कपात करणे अशा प्रकारांचा समावेश होतो. फसवणुकीपैकी बोटावर मोजण्याएवढे शेतकरी पोलिसांकडे दाद मागतात आणि उलगडा होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे शेतकरी सांगतात. आता मात्र मोहाडी (ता. दिंडोरी) येथील राजेंद्र कळमकर यांनी निर्यातीच्या 42 लाख रुपये शिलकीचे धनादेश न वटल्याच्या केलेल्या तक्रारीनुसार पुण्याच्या डीपी सेल्स कॉर्पोरेशनचे संचालक ज्ञानदेव भोसले यांना पोलिसांनी अटक केली. तक्रारीतील उर्वरित संशयित फरार आहेत. ही एकीकडे परिस्थिती असली, तरीही तक्रार दिल्यावर फसवणूक करणारे पुन्हा शेतकऱ्यांना भेटतात, काही पैसे हातावर टेकवतात अन्‌ तक्रार मागे घ्यायला लावून पुन्हा पोबारा करतात, असेही प्रकार घडले आहेत. 

शेतकऱ्यांनाच मार 
बांधावर द्राक्षे विकताना व्यापाऱ्याने सांगितलेल्या पत्त्याच्या आधारे शेतकरी व्यापाऱ्याला पैश्‍यांसाठी शोधायला जातात. अनेकदा तो पत्ता चकवा देणारा असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. काही ठिकाणी झोपडीत राहणारी व्यक्ती कोटींचे व्यवहार करत असल्याचे निदर्शनास आल्याने शेतकरी आश्‍चर्यचकित झाले आहेत. काही शेतकऱ्यांना पैसे बुडवणाऱ्याच्या गावात गेल्यावर मार खावा लागलाय. 

गुन्ह्याचे बदलते स्वरुप 
द्राक्षे खरेदी केल्यावर पळून जाणारा व्यापारी पुन्हा त्या भागात येत नाही. त्याचे नातेवाईक, कुटुंबीय येऊन दुसऱ्या नावाने खरेदी करतात. एवढेच नव्हे, तर विकलेल्या द्राक्षांचे पैसे सोडून देण्याची मानसिकता शेतकऱ्यांची झाल्यावर त्यातील काही जण बांधावर खरेदीसाठी आल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहेत. अशा वेळी असे ठकबाज परत दोन ते तीन वर्षे चोख व्यवहार करत शेतकऱ्यांचा विश्‍वास संपादन करतात आणि पुढच्या हंगामात पैसे बुडवून पोबारा करतात. 

नाशिक जिल्ह्यात एका हंगामात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक पाचशे कोटींपर्यंत आहे. हे रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून ग्रामसभा घेत रोखीच्या व्यवहाराची मानसिकता तयार केली आहे. कृषी क्षेत्रातील विक्री व्यवस्थेच्या दृष्टीने आश्‍वासक पाऊल आहे. 
- कैलास भोसले (महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघ) 

6,00,000 टन - यंदाची शिल्लक द्राक्षे 
40,000 रुपये - द्राक्षांचा टनाला सरासरी भाव 
500 कोटी रुपये - द्राक्ष उत्पादकांची दरवर्षी होणारी फसवणूक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: ठाणे लोकसभा उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ आदित्य ठाकरे घेणार सभा

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT