Gulabrao patil sabha
Gulabrao patil sabha 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan sabha : कुटुंबावर टीका करणाऱ्यांना जनताच जागा दाखवेल : गुलाबराव पाटील 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : "जळगाव ग्रामीण'मधील मतदार हे शिवसेना- भाजपच्या विचारांचे आहेत. पाच वर्षांत केलेला विकास व जनसंपर्क असल्यामुळे मतदारसंघात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाल्याने विजय निश्‍चित आहे. आजवर जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे व प्रेमामुळे मी भारावलो असून, विरोधकांना त्यांचा दारुण पराभव डोळ्यांसमोर दिसत आहे. त्यामुळे ते वैयक्तिक व माझ्या कुटुंबावर टीका करीत असल्याने हरलेल्या विरोधकांची वृत्ती आज उघड झाली असून, माझे कुटुंब असलेली जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे भावनिक उद्‌गार सहकार राज्यमंत्री तथा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी शिरसोली येथील भरपावसात घेतलेल्या जाहीर सभेत काढले. 

सभेत ज्याप्रमाणे पाऊस पडत आहे, त्याचप्रमाणे "धनुष्यबाणा'ला मतदान करून मतांचा पाऊस पडू द्या व प्रचंड मतांनी विजयी करा, अशी सादही त्यांनी मतदारांना घातली. पाऊस सुरू असतानाही हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. श्री. पाटील यांनी विरोधकांवर चौफेर टीका करून व शेरोशायरी करून भरपावसात अक्षरशः धो- धो धुतले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, "रिपाइं'चे अनिल अडकमोल, गोपाल जिभाऊ, रावसाहेब पाटील, भगवान सोनार यांनीही गुलाबराव पाटलांना विजयी करण्याचे आवाहन केले. 

व्यासपीठावर "रिपाइं'चे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, समाधान पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पवार, "रासप'च्या शीतल चिंचोरे, रावसाहेब पाटील, नाना सोनवणे, नगरसेवक विष्णू भंगाळे, शरद तायडे, अर्जुन पाटील, धोंडू जगताप, अमित शकील, प्रवीण पाटील, मुश्‍ताक मेंबर, बापू मराठे, शशी वाणी, शेनफडू पाटील, मुरलीधर ढेंगे, काळू मेंबर, जनाअप्पा कोळी, नंदू पाटील, बबन धनगर, ज्ञानेश्वर काटोले, विकास पाटील, विजय पाटील सरिता माळी, शोभाताई चौधरी, ज्योतीताई शिवदे, मनीषा पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. युवासेनेचे विकास पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आभार विजय पाटील यांनी मानले. दरम्यान, आज सायंकाळी पाचला प्रचाराची सांगता झाली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT