residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

"हंडाभर चांदण्या' नाटकाला महाराष्ट्र फौन्डेशनचा रा. शं. दातार पुरस्कार 

सकाळ वृत्तसेवा


नाशिक ः अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेतर्फे दरवर्षी साहित्य व समाजकार्यासाठी पुरस्कार दिले जातात. 2019 या वर्षासाठी साहित्यातील चार आणि समाजकार्यातील चार अशा एकूण आठ पुरस्कारांची घोषणा आज झाली. यामध्ये नाशिकच्या दत्ता पाटील लिखित "हंडाभर चांदण्या' या नाटकाला रा. शं. दातार नाट्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पन्नास हजार रूपये, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारामुळे "हंडाभर चांदण्या' या नाटकाच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

महाराष्ट्र फौन्डेशनतर्फे जाहीर झालेल्या साहित्यिक पुरस्कारांमध्ये वसंत आबाजी डहाके (यवतमाळ) यांना दिलीप वि. चित्रे स्मृतीनिमित्त दिला जाणारा "साहित्य जीवनगौरव' दिला जाणार आहे.

विविध पुरस्कारात छाप

कृष्णात खोत, कोल्हापूर यांच्या "रिंगाण" या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार तर मुंबईच्या नितीन रिंढे यांच्या "लीळा पुस्तकांच्या' या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच समाजकार्यासाठीच्या पुरस्कारांममध्ये राजेंद्र बहाळकर ( पुणे ) यांना विशेष कृतज्ञता पुरस्कार, केरळ शास्त्र साहित्य परिषद (कोझिकोडे,केरळ) या संस्थेला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार, जमीला बेगम पठाण (इताकुला, मुंबई ) यांना कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार तर शहाजी गडहिरे (सोलापूर) यांना कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार दिला जाणार आहे.

पुरस्कार वितरण 12 जानेवारीला पुण्यात

या आठही पुरस्कारांचे वितरण 12 जानेवारीला पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सायंकाळी 5 वाजता होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील माहिती हक्क कार्यकर्त्या अरुणा रॉय यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी महाराष्ट्र फाऊंडेशनचे अध्यक्ष अंकुश कर्णिक, या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांच्यासह महाराष्ट्र फाऊंडेशनचे अनेक सदस्य उपस्थित राहणार आहेत. 


अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा रा. शं. दातार पुरस्कार माझ्या "हंडाभर चांदण्या' नाटकाच्या लेखनाला जाहीर होणं हा माझ्यासाठी खूप सुखद धक्का आहे. महाराष्ट्र फाउंडेशन ही समाजात भरीव कार्य करणारी महत्वाची संस्था आहे. आजवर या पुरस्काराने अनेक महत्त्वाच्या श्रेष्ठ साहित्यकृतींना, व्यक्तींना गौरविले गेले आहे. या मांदियाळीत हंडाभर चांदण्याच्या लेखनाचाही गौरव झाल्याने आनंद झालाय, पण त्यासोबत जबाबदारीही वाढली आहे. या नाटकाला रंगमंचावर सशक्तपणे साकारणाऱ्या टीमला मी हा पुरस्कार समर्पित करीत आहे. 
- दत्ता पाटील, नाट्यलेखक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT