residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

पाणी उचलण्याच्या बदल्यात महापालिकेचे जलसंपदाला पाच कोटी अदा

सकाळवृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या माध्यमातून गंगापूर व दारणा धरणातून गेल्या वर्षभरात 158 अरब 16 कोटी लिटर पाण्याचा वापर झाला आहे. धरणातून पाणी उचलण्याच्या बदल्यात महापालिकेने जलसंपदा विभागाला पाच कोटी साठ लाख रुपयांचे देयक अदा केले आहे.

नाशिक शहरासाठी गंगापूर धरण व दारणा धरणातून पिण्यासाठी पाणी उचलले जाते. 113 जलकुंभांच्या माध्यमातून घराघरांमध्ये पाणी पुरवठा होतो. 15 ऑक्‍टोबर 2017 ते 31 जुलै 2018 या कालावधीसाठी शहरासाठी गंगापूर धरणातून 3900 तर दारणा नदी पात्रातील चेहडी बंधारा येथून 400 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित केले होते. त्यापैकी गंगापूर धरणातून 145 अरब 24 कोटी 7 लाख लिटर व चेहडी बंधाऱ्यातून 12 अरब 92 कोटी 7 लाख लिटर असे एकुण 158 अरब 16 कोटी 14 लाख लिटर पाणी उचलले आहेत.

जानेवारी 2018 मध्ये गंगापूर धरणातून सर्वाधिक 12 अरब 89 कोटी 91 लाख लिटर तर चेहडी बंधारा येथून ऑगस्ट 2017 मध्ये सर्वाधिक 1 अरब 42 कोटी लिटर पाणी उचलण्यात आले आहे. वर्षभरात उचललेल्या पाण्याचे पाच कोटी 60 लाख रुपयांचे देयके पाटबंधारे विभागाला अदा करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाने सादर केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात डॉल्बी वाजवण्यास बंदी, प्रसासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT