residentional photo
residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

आयटकचे राज्य अधिवेशन शनिवारपासून,500 प्रतिनिधींचा सहभाग 

सकाळवृत्तसेवा

नाशिकः ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (आयटक) या कामगारांच्या संघटनेचे शनिवारपासून (ता. 24) 18 वे राज्य अधिवेशन श्रीकृष्ण लॉन्स, सिद्धार्थ कामत हॉटेल शेजारी, पुणे रोड येथे होणार आहे. आयटकशी संबंधीत विविध संघटनांचे पाचशे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
 

अधिवेशनात शेतकरी कामगारांच्या चळवळीची एकजुटीवर विशेष सत्र, संघटनेचा राजकीय व संघटनात्मक अहवाल, कवितावाचन तसेच रविवारी (ता. 25) संविधान जागर रॅली आणि राष्ट्रीय महासचिव अमरजीत कौर, दिल्ली यांच्या संविधान जागर सभेने या अधिवेशनाची सांगता होणार असल्याची माहिती आयटकचे राज्यसचिव राजू देसले यांनी दिली. मेघदूत शॉपिंग सेंटर, सीबीएस येथील आयटकच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष व्ही. डी. धनवटे, राज्यसचिव ज्योती नटराजन, वीज वर्कर्स फेडरेशनचे अरूण म्हस्के, जिल्हा संघटक विजय दराडे, उदय चौधरी, प्रताप भालके, विराज देवांग, माया घोलप उपस्थित होते. 

श्री. देसले म्हणाले, की अधिवेशन स्थळाचे "स्वातंत्र्यसैनिक कॉ. माधवराव गायकवाड नगरी' असे नामकरण करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. 24) सकाळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (भाकप) ज्येष्ठ नेत्या कुसुमताई गायकवाड यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येणार असून सकाळी 10 वाजता भाकपचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते उद्‌घाटन होईल. आयटकचे राज्याध्यक्ष सुकुमार दामले अध्यक्षस्थानी तर स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हाध्यक्ष व्ही. डी. धनवटे उपस्थित राहतील.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी तीन वाजेपर्यंत देशात 50.71 टक्के मतदान; महाराष्ट्र अजूनही सगळ्यात मागे

Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश! चकमकीत लष्करचा प्रमुख बासित अहमद डारसह तीन दहशतवादी ठार

Kushal Badrike : "... ओळखीचे चेहरे अनोळख्या स्टेशनवर निघून जातात"; कुशलने व्यक्त केली खंत

Summer Home Decor Tips: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा करुन घ्या फायदा; 'अशा' पद्धतीने करा घराचा मेकओव्हर.. सर्वजण पाहतच राहतील

SCROLL FOR NEXT