live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेस जळगावातून प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनाआशिर्वाद यात्रेस जळगाव येथून प्रारंभ झाला. विसनजी नगरातील इच्छापूर्ती गणपती मंदिरात गणेशाची आरती करून त्यांनी यात्रेस सुरूवात केली. 
युवासेना प्रमुख यांच्या राज्यस्तरीय जनआर्शिवाद यात्रेस जळगाव येथून प्रारंभ करण्यात आला. आज सकाळी साडेअकरा वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले.राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते जळगाव शहरातील विसनजी नगरातील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे रवाना झाले. मंदिरात त्यांनी गणपतीची आरती करून दर्शन घेतले व यात्रेला प्रारंभ केला. यावेळी राज्याचे बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील,तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्या समवेत होते. यावेळी त्यांनी जनतेला हात उंचावून अभिवादन केले त्यावेळी जनतेतूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ही यात्रा पाचोऱ्याकडे रवाना झाली. पाचोरा येथे यात्रेची पहिली जाहिर सभा होणार आहे. भडगाव, कासोदा, एरंडोल, धरणगाव, चोपडा, सावखेडा, अमळनेर, पारोळा येथून ही यात्रा आज धुळ्याकडे जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT