उत्तर महाराष्ट्र

ऍड. निकमांशी दोन दिवसात चर्चा करणार : अरुणभाई गुजराथी

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवडणूक लढवावी यासाठी आपण राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याशी दोन दिवसात चर्चा करणार आहोत, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अरुणभाई गुजराथी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई येथील झालेल्या बैठकीत जळगाव लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नावाची चर्चा करण्यात आली. तसेच त्यांची सहमती घेण्यासाठी विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 
याबाबत अरुणभाई गुजराथी यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, पक्षाच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली. पक्षाच्या नेत्यांनी आपल्यावर त्यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी दिलेली आहे. त्यानुसार आपण मुंबईहून जळगावला आल्यानंतर उद्या (ता. 6) किंवा सोमवारी (ता. 7) त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. 

आपली उमेदवारी प्राथमिक 
रावेर मतदार संघासाठी अरुणभाई गुजराथी याच्या नावाची चर्चा झाली आहे. त्याबाबत ते म्हणाले, आपली उमेदवारी निश्‍चित नाही, ती केवळ प्राथमिक घोषणा आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षातर्फेच घेण्यात येईल. मात्र पक्षाने उमेदवारी दिली, तर आपण लढणार आहोत. 
 
तर रावेरची जागा कॉंग्रेसलाही 
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागा वाटपात रावेर लोकसभा मतदार संघाची जागा कॉंग्रेसला सोडण्यात आल्याचा कांगावा कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात येत आहे. त्याबाबत मत विचारले असता. गुजराथी म्हणाले, राज्यातील आठ मतदार संघाबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. त्याबाबत पक्षाचे नेते शरद पवार निर्णय घेत आहे. वरीष्ठस्तरावर झालेल्या चर्चेत जर रावेरची जागा कॉंग्रेसला सोडण्याचा निर्णय झाला, तर ती जागा कॉंग्रेसलाही आम्ही सोडणार आहोत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

SCROLL FOR NEXT