उत्तर महाराष्ट्र

घरबसल्या करा उपचार...डॉक्‍टरांसाठीही आता जनजागृतीची मोहीम 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : जगासह आता देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढल्यानंतर त्याच्याशी लढा देणाऱ्यांत सर्वांत पुढे असलेल्या डॉक्‍टरांनीही काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आता डॉक्‍टरांच्या जनजागृतीची मोहीम सुरू झाली असून, त्याअंतर्गत डॉक्‍टरांनी रुग्णांना किरकोळ आजारांसाठी प्रत्यक्ष दवाखान्यात न बोलावता ऑनलाइन औषधी देण्यासह अनेक पर्याय सूचविले जात आहेत. 

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी देश सज्ज झाला आहे. त्यात वैद्यकीय यंत्रणा सर्वांत आघाडीवर असून, या यंत्रणेतील प्रमुख घटक म्हणून डॉक्‍टर व नर्स, वॉर्डबॉय यासह अन्य घटकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. अशा स्थितीत डॉक्‍टरांनी रुग्णांच्या अन्य किरकोळ आजारांसह नियमित तपासणीदरम्यान विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. त्यासाठी आता काही तज्ज्ञ आपापल्या वतीने सूचना देत असून त्यातून डॉक्‍टरांमध्येही जनजागृती केली जात आहे. 

दुकानांवर लावणार माहितीपत्रक 
होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. रितेश पाटील व त्यांच्यासोबतच्या काही डॉक्‍टरांनी तपासणीबाबत आवाहन करताना किरकोळ आजारासाठी रुग्णांनी डॉक्‍टरकडे न जाता, त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून त्रास काय होतोय, ते सांगावे व व्हॉटस्‌ऍपवर औषधी मागून घ्यावी, ती औषधी घेण्यासाठी फक्त मेडिकलला जावे, असे म्हटले आहे. या व अन्य सूचनांचे माहितीपत्रक छापून ते रुग्णांच्या जागृतीसाठी प्रत्येक किराणा दुकानावर दर्शनी भागात लावण्यात येणार आहे. त्यातून घरबसल्या उपचार घेता येतील, बाहेर जायची गरज पडणार नाही. तसेच यामुळे विविध स्पेशालिस्ट डॉक्‍टरांवरील ताणही कमी होईल. 

...असे सुचविले पर्याय 
मानसोपचार समुपदेशक नीरज देव यांनी काही पर्याय डॉक्‍टरांसाठी सुचविले आहेत. त्यात दिवसातून मोजके व अत्यावश्‍यक तेवढेच रुग्ण बघावे, दोन, तीन वा कधीकधी अधिक वेळा प्रिस्क्रिप्शनसाठी एकच लेटरहेड वापरले जाते. तर काही जण मागील भागही वापरतात. सध्या काही दिवस आपण प्रत्येक वेळी रुग्णाला नवीन कागद द्यावा, शक्‍यतो रुग्णाचे रिपोर्टस प्रत्यक्ष न बघता डिजिटली बघावे, जुने रिपोर्टस गरज असेल तेव्हाच बघावे, प्रिस्क्रिप्शन व रिपोर्टस डिजिटल स्वरूपात द्यावे, शुल्क घेताना डिजिटल घेता आले तर उत्तम. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT