उत्तर महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांकडून नगरभूमापन कार्यालयाची झाडाझडती! 

सकाळवृत्तसेवा

जळगाव ः येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नगरभूमापन कार्यालयात प्रमाणपत्रासाठी दलालांचा सुरू असलेल्या सुळसुळाटामुळे सर्वसामान्यांना प्रमाणपत्रासाठी तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. याबाबत "सकाळ'मध्ये 29 मेस "नगरभूमापन कार्यालयात प्रमाणपत्रासाठी दलाली' अशा आशयाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी एक जूनला नगरभूमापन कार्यालयाची अचानक झाडाझडती घेऊन शिपायासह कर्मचारी, अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. नगरभूमापन कार्यालयातील "रेकॉर्ड'ची तपासणी केली. "रेकॉर्ड' लवकर सापडत नसल्याने शिपायांनाही धारेवर धरले. 

नगरभूमापन कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. अनेक नागरिकांनीही तक्रारी केल्या. यामुळे अचानक जिल्हाधिकाऱ्यांनी नगरभूमापन कार्यालयात अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींचा जाब विचारला. "रेकॉर्ड' जागेवर ठेवले नसल्याने ते लवकर उपलब्ध होत नाही, याला जबाबदार शिपायांना बोलाविले. मात्र, शिपायांनी समोर येण्याचे धाडस दाखविले नाही. शेवटी एक महिला समोर आली. तिचे पद विचारताच मी शिपाई असल्याचे सांगितले. तब्बल दहा मिनिटांपासून मी शिपाई कोठे आहे, असे विचारतो अन्‌ तू येथेच असताना सांगत नाही,' याबाबत संताप व्यक्त केला. शिपाई रोजमेरी मेश्रामकर हिची एरंडोलला बदली करण्यात आली. 

नगरभूमापन कार्यालयातील इतरांनाही कामाबाबत तक्रारी का येतात? असे विचारून कामात सुधारणा करा; अन्यथा कारवाई होईल, असे सांगितले. याच कार्यालयातील अस्वच्छतेबाबतही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी नाराजी व्यक्त केली. नगरभूमापन कार्यालयाशी संबंधित जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय असते. यामुळे जिल्हा अधीक्षक सुनील घोंगडे यांनाही नगरभूमापनच्या कार्यालयाबाबत तक्रारी आहेत. त्याकडे लक्ष का देत नाहीस? असा जाब विचारला. कार्यालयातील अनागोंदीबाबत आणखी कोणावर कारवाई होते? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BJP Protest Viral Video : वरळीत भाजप मोर्चामुळे वाहतूक ठप्प; कोंडीत अडकलेल्या महिलेने गिरीश महाजनांना झापलं, व्हिडिओ व्हायरल

SRH vs DC: Abhishek Sharma चं वादळी शतक! रोहित शर्माला मागे टाकत विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी; हैदराबादने रचला धावांचा डोंगर

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

Video: पुण्यात पीएमपी बस थेट दुकानात घुसली! अप्पा बळवंत चौकातील थरार; व्हिडीओ व्हायरल

Baramati News : जय पवार यांच्या भाषणाने बारामतीकर भावुक.....

SCROLL FOR NEXT