live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

ठेकेदाराने लावली शहरातील स्वच्छतेची वाट 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः महापालिकेने "शहर स्वच्छ व सुंदर'साठी शहरातील दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेचा एकमुस्त ठेका नाशिकच्या वॉटर ग्रेस कंपनीला दिला; परंतु वीस दिवसांतच या ठेकेदाराने शहरातील स्वच्छतेची वाट लावली असून, त्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्‍न अधिक गंभीर बनला आहे. ओला-सुका कचरा विलगीकरण व्यवस्थित केले जात नसून, याबाबत महापालिकेचा आरोग्य विभागदेखील हतबल झालेला दिसत आहे. 
शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा ठेका नाशिक येथील वॉटर ग्रेस कंपनीला दिला. 21 ऑगस्टपासून सर्व प्रभागांत या ठेकेदाराने कामाला सुरवात केली; परंतु तीन- चार दिवसांत घंटागाड्या न येणे, कचरा न उचलणे, तसेच कचऱ्याचे वजन वाढावे यासाठी माती भरणे, असे प्रकार घडले आहेत. यासंदर्भात नगरसेवक प्रशांत नाईक यांनी केलेल्या व्हिडिओवरील ठेकेदाराच्या कामावर महासभेत, स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांनी चांगलेच खडसावले होते. त्यातच आमदार सुरेश भोळे यांनी शुक्रवारी (6 सप्टेंबर) बैठक बोलावून ठेकेदाराच्या कामात सुधारणा न झाल्यास मक्ता रद्द करण्याचा इशारा दिला आहे; परंतु मुळात दैनंदिन स्वच्छता कामाचे ठेकेदाराकडे नियोजन नसल्याने ही समस्या उद्‌भवलेली दिसत आहे. 

ठेकेदाराच्या नियोजनात त्रुटी 
महापालिका आरोग्य विभागाकडून करारनामानुसार करण्यात येणारी कामे व यंत्रणा उभी करणे हे ठेकेदाराने काम सुरू झाल्यापासून करणे आवश्‍यक होते; परंतु अद्याप ठेकेदाराचे कार्यालय नाही, सुपरवायझर, कामाचे नियोजन नाही, वाहनांवर जीपीएस यंत्रणा नाही, घंटागाड्यांवर चालक कमी, अशा अनेक त्रुटी आरोग्य विभागाने काढल्या आहेत. दोन- तीन दिवसांत याबाबत ठेकेदाराला नोटीस बजावली जाणार आहे. 

कचरा विलगीकरणाविनाच 
ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्यासाठी 80 नवीन घंटागाड्या घेण्यात आल्या आहेत; परंतु घंटागाड्यांचे चालक व हेल्परकडून अजूनही ओला-सुका कचरा एकत्र संकलन केला जात आहे. त्यामुळे ओला कचरा कंपोस्टिंगसाठी शहरात तीन ते चार ठिकाणी करण्याचे नियोजन महापालिकेतर्फे अजूनही नाही. 

कचऱ्याचे वजन वाढले; अस्वच्छता कायम 
शहरातील कचऱ्याचे ठेकेदाराकडून गेल्या वीस दिवसापासून संकलन केले जात आहे. त्यानुसार कचऱ्याचे वजन शहरातील टोल नाक्‍यांवर केले जात असून, सध्या सुमारे रोज 140 टन कचरा संकलन केला जात आहे. मक्ता सुरू होण्यापूर्वी महापालिका व ठेकेदाराकडून रोज 110 टन कचरा संकलित केला जात होता. कचऱ्याच्या वजनात वाढ झाली. मात्र, अस्वच्छतेच्या तक्रारी वाढलेल्या दिसत आहेत. 

ओला-सुका कचऱ्यासाठी डसबिन हवेत 
ओला व सुका कचरा विलगीकरणासाठी नागरिकांसह विविध संकुलांतील गाळे, विक्रेत्यांकडे डसबिन देणे आवश्‍यक आहे. यासाठी महापालिका आरोग्य विभागाकडून सेवाभावी संस्थांना घेऊन पुढाकार घेण्याची आवाहन करण्यात आले आहे. 

शहरातील अस्वच्छतेच्या कामाबाबत तक्रारी वाढत आहेत. याबाबत ठेकेदाराला काम सुधारण्याच्या वारंवार सूचनाही दिल्या आहेत. मक्ता सुरू झाला, तेव्हाच कामाला ज्या उपाययोजना व नियोजन करणे आवश्‍यक होते, ते त्यांनी केले नाही. 
- मिनीनाथ दंडवते, उपायुक्त, आरोग्य विभाग, महापालिका 

अशी आहे आकडेवारी 
- ठेकेदाराकडून 500 कर्मचारी नियुक्त 
- नियंत्रणासाठी केवळ एक अधिकारी 
- घंटागाड्या 100 
- ट्रॅक्‍टर- 20 
- डोझर - 10 
- जेसीपी - 2 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT