toldhali 
उत्तर महाराष्ट्र

टोळधाडीचा या तालुक्‍यालाही धोका !; शेतकऱ्यांमध्ये भीती

संदीप शिंपी

 चांगदेव (ता. मुक्ताईनगर) : अनेक वर्षांपासून न दिसलेले टोळधाड विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यातील काही भागात अचानक अवतरली आहे. वातावरणातील बदलावामुळे महाराष्ट्रातही याचा प्रादुर्भाव झाला आहे. टोळधाडीच्या थव्यांची संख्या लाखोंच्या पटीत असल्याने अवघ्या एका रात्रीत कित्येक एकर क्षेत्रातील पिके ही टोळधाड फस्त करते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मध्य प्रदेशातून सातपुडा मार्गे महाराष्ट्रात टोळधाड किडीचे आगमन विदर्भात झाले. विदर्भ सुध्दा मुक्ताईनगरच्या सिमेलगतच असून, मुक्ताईनगर तालुक्यास या टोळधाडीचा फटका बसण्याची संभावना आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा - वढोदा हा परिसर सातपुड्याच्या निकट असून, सर्वप्रथम या भागात टोळधाडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. प्रामुख्याने ही किड हिरव्या पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकऱ्यांनी याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

कृषी विभागाच्या उपाययोजना 
या किड्यांनी अंडी घातलेल्या जागा शोधून जमिनीच्या भोवताली चर खोदल्यास पिल्लांना अटकाव करुन नियंत्रण करता येते. नंतर अंडी शोधून सामूहिकरीत्या नष्ट कराव्यात. टोळधाडीची सवय एका दिशेने दौडत जाण्याची आहे. त्यामुळे येणाऱ्या थव्यांच्या वाटेवर ६० सेमी रुंद व ७५ सेमी खोल चर खोदून पिलांना पकडता येऊ शकते. सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर या टोळी जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतांमध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रणात येऊ शकते. 
थव्यांच्या स्थितीत पिल्लांची संख्या जास्त असल्यास नीम तेल प्रती हेक्टरी २.५ लीटर फवारणी केल्याने कीड नष्ट होते. 

गावागावांत जनजागृती 
कृषी विभागातर्फे गावोगावी कृषी साहाय्यक पाठवून ग्रामपंचायत कार्यालय व तलाठी कार्यालयात सूचना फलकावर माहिती दिली जात आहे. तसेच सोशल मिडियाचा वापर देखील कृषी विभागाने केला आहे. कृषी विभागामार्फत देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. असे तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी कळविले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT