उत्तर महाराष्ट्र

रेशनकार्ड "अपग्रेशन'साठी आर्थिक सक्ती 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव :शहरासह जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमध्ये रेशन कार्डातील व्यक्तीचे आधारकार्ड लिंकिंगसाठी दिल्यावरही पाच पाच महिने आधारलिंकिंग होत नाही. आधारकार्ड लिंकसाठी रेशनकार्डधारकांकडून पाचशे ते सहाशे रूपये मागितले जातात तरच आधारकार्ड लिंक केले जाते, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. 


शहरासह जिल्ह्यात 1 हजार 832 हून अधिक रेशन दुकानदार आहेत. प्रत्येकाकडे ई-पॉज मशिन देण्यात आल्या आहेत. आधारकार्ड रेशनकार्डला लिंक केल्यानंतर कार्डामधील प्रत्येक सदस्यांचा अंगठा थम्ब म्हणून घेतला जातो. यामुळे रेशनकार्ड धारकांच्या कुटुंबातील कोणीही सदस्य रेशन घेण्यास गेल्यास त्याचे थम्ब घेऊन रेशनचे धान्य दिले जाते. मात्र, त्यासाठी रेशनकार्ड आधारकार्डशी लिंक करावे लागतात. 
अनेक रेशनकार्डधारकांनी तीन तीन वेळा कुटुंबातील सदस्यांची सर्व कागदपत्रे दिली आहे. मात्र, त्यांना रेशनकार्डावर धान्य मिळत नाही. कुटुंब प्रमुख विचारणा करण्यास गेल्यास आधारकार्ड लिंक करण्यासाठी संबंधित व्यक्तीला पाचशे रुपये द्यावे लागतात. ते दिले तरच आधार लिंक होईल; अन्यथा नाही. पाचशे रुपये अनेकांनी दिल्याची नोंदवही ते दाखवितात. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

धान्याचा काळाबाजार 
अनेक रेशन दुकानदारांनी नागरिकांचे आधारकार्ड लिंक न करण्याचा धंदाच सुरू केला आहे. आधारकार्ड लिंक न झाल्यास त्या कुटुंबांचे धान्य काळ्या बाजारात विकले जाते. यामुळे थम्ब मशिन आल्यामुळे काळ्या बाजारात रेशनचे धान्य जाणार नाही, अशी समजूत चुकीची आहे. नक्की वाचा : अरे वा...142 शेतकऱ्यांची कर्जमाफीची रक्कम प्राप्त 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajkot TRP Game Zone Fire: सौराष्ट्रातील सर्वात मोठा गेम झोन 'डेथ झोन' कसा बनला? 2 एकरमध्ये पसरलेले, 20 हून अधिक खेळले जायचे

Railway News: मध्य रेल्वेवर ३६ तासांचा ब्लॉक; ६९ मेल- एक्सप्रेस गाड्या रद्द!

Cyclone Remal: 'रेमल' घेऊन येत आहे विनाश! जाणून घ्या कधी, कुठे अन् कसा परिणाम होईल, मुसळधार पाऊस अन् वादळाचा इशारा...

Eng vs Pak : आयर्लंडपाठोपाठ इंग्लंडपुढेही पाकिस्तान नतमस्तक; बटलरच्या संघाने बाबरच्या टीमला आणले रडकुंडी

T20 World Cup 2024 : कोहली-पांड्या टीम इंडियासोबत का गेले नाहीत अमेरिकेला? मोठे कारण आले समोर

SCROLL FOR NEXT