esakal | कुटूंबीय लग्नाच्या तयारीत...तेवढ्यात पडला छापा ! 
sakal

बोलून बातमी शोधा

कुटूंबीय लग्नाच्या तयारीत...तेवढ्यात पडला छापा ! 

इंदूरमार्गे डीआरआय पथकाने खोदकाम करीत सोमवारी जळगाव गाठले. पथकाकडून सोमवारी दिवसभर बंद दरवाजा दुकानाच्या व्यवहाराची, कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

कुटूंबीय लग्नाच्या तयारीत...तेवढ्यात पडला छापा ! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव  : शहरातील सराफ बाजारातील सोने-चांदीच्या एका होलसेल व्यापाऱ्याकडे कर चुकवेगिरीच्या संशयावरून मुंबई येथील केंद्रीय महसूल संचालनालय पथकाने (डीआरआय) छापा टाकला. पथक गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून होते. चौकशीत दहा लाख रुपयांची रोकड व तसेच अर्धा किलो सोने बेहिशोबी आढळून आल्याचे विश्‍वसनीय वृत्त असून, याला सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतमचंद लुनिया यांनी दुजोरा दिला आहे. दोन दिवसांच्या सलग चौकशीनंतर पथक पुन्हा मुंबईकडे परतल्याची माहिती मिळाली आहे. 

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील सराफ बाजारात सोने-चांदीच्या एका होलसेल व्यापाऱ्याच्या सराफा पेढीवर केंद्रीय अबकारी विभागाने छापा टाकला. अत्यंत गोपनीय पद्धतीने टाकण्यात आलेल्या या छाप्याची कारवाई दिवसरात्र तीस तास (दोन दिवस) सुरू होती. केंद्रीय अबकारी संचालनालयाच्या पथकाला संबंधित व्यापारी सोने-चांदीच्या व्यवहारात कर चुकवेगिरी करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर इंदूरमार्गे डीआरआय पथकाने खोदकाम करीत सोमवारी जळगाव गाठले. पथकाकडून सोमवारी दिवसभर बंद दरवाजा दुकानाच्या व्यवहाराची, कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यानंतर मंगळवारी  सकाळपासून पथकाने चौकशीला सुरवात केली. मंगळवारीही दिवसभर पथकाने बंदद्वार चौकशी केली.

नक्की वाचा : दोन महिन्यांपासून ती होती बेपत्ता...पुन्हा चुकली रस्ता 
 

दहा लाख, अर्धा किलो सोने बेहिशेबी

दोन दिवसांच्या चौकशीत पथकाने दुकानातील विविध व्यवहार, त्याची कागदपत्रे, कच्च्या चिठ्ठ्या दुकानात तसेच घरात असलेली रोकड तसेच सोने-चांदीचे दागिने याच्या हिशोबाबत माहिती घेतली. यात संबंधित व्यापाऱ्याकडे अर्धा किलो सोने, तसेच दहा लाखांची रोकड आढळून आली. या रकमेचा तसेच सोन्याबाबत त्या व्यापाऱ्याकडे कुठलीही तसेच नोंदी नसल्याने ते बेहिशोबी म्हणून पथकाने जप्त केले आहे. सराफ बाजारातील या कारवाईच्या वृत्ताला सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतमचंद लुनिया यांनी दुजोरा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे पथक जळगावात ठाण मांडून असल्याने सराफ बाजारात एकच खळबळ उडाली होती. 

आर्वजून पहा : मधमाशांनी रोखला अंत्यविधी...शेवटी बोलाविले जेसीबी
 

गुरुवारी व्यापाऱ्याकडे लग्न 
संबंधित व्यापाऱ्याच्या डॉक्‍टर मुलाचा एक दिवसानंतर लग्न सोहळा होत आहे. विशेष म्हणजे, इंदूर येथूनच अबकारी विभागाला त्याच्या व्यवसायाबाबतची गुप्त माहिती प्राप्त झाली आहे. संपूर्ण कुटुंबीय लग्नाच्या तयारीत व्यस्त असताना त्यांच्याकडे अचानक छापा पडल्याने सराफा बाजारात एकच खळबळ उडाली आहे. 

loading image