live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

ग्रंथालयात दिव्यांगांना मिळाला "डिजिटल गुरू' 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : सध्या डिजिटल तंत्रज्ञान हा सगळीकडे उपयुक्त असा शब्द बनला असून ग्रंथालय देखील त्याला अपवाद ठरलेली नाहीत. त्याच्या आगमनामुळे पुस्तके आणि ग्रंथालयाच्या स्वरूपात आमूलाग्र बदल झाला आहे. सामान्य विद्यार्थ्यांसोबतच दिव्यांगांना देखील शिक्षणासाठी या आधुनिक पद्धतीचा उपयोग व्हावा यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (रुसा) अंतर्गत सर्व समावेशी शिक्षण संसाधन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना ऑडिओ पद्धतीने संगणकाचे व पुस्तकांचे ज्ञान देण्यात येत आहे. त्यामुळे जणू काही दिव्यांगांना या केंद्रातून डिजिटल गुरूच मिळाला आहे. 

दिव्यांगांचे उच्च शिक्षणात प्रमाण वाढावे, त्यांना आधुनिक जगासोबत आणावे या हेतूने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रात सर्व समावेशी शिक्षण संसाधन केंद्र सुरू करण्यात आले. दिव्यांग विद्यार्थ्यांना अव्यंग विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिक्षणाच्या संधी उपलब्ध कराव्यात, त्यांना आवश्‍यक साधन सुविधा तसेच अभ्यासपूरक पर्यावरण उपलब्ध करून द्याव्यात, हा हेतू केंद्राच्या उभारणीमागे आहे. अंध, मूकबधिर, अस्थिव्यंगबाधित, गतिमंद अशा सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना आवश्‍यक अध्ययन साधनांची उपलब्धता करण्यात आली आहे. यात एकावेळी 21 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहे. 

यातून घडेल करिअर 
केंद्रात ब्रेल पुस्तके, ऑडिओ बुक्‍स, स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेअर बसविलेले संगणक, ब्रेल प्रिंटिंग, ई-बुक्‍स, ई-जर्नल्स, ई-डाटाबेसेस सारखे ई-रिसोर्सेस, वाय-फाय सुविधेसह इंटरनेट, मॅग्निफायर, स्पेक्‍टॅकल्स यांसारखी अल्पदृष्टी विद्यार्थ्यांना उपयुक्त साधने आदी बऱ्याच सुविधांची उपलब्धता केली आहे. यासोबतच फ्लॅट बेड स्कॅनर, हॅण्ड हेल्ड स्कॅनर, टेक्‍स्ट, पीडीएफ, ई-बुक फॉरमॅट फाइल वाचन करणारे डेझी प्लेअर उपकरण, ध्वनी मुद्रण ठेवण्यात आले असून याचा करिअर घडविताना मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. 
 
हे आहेत उद्देश 
- दिव्यांग व प्रज्ञाचक्षू व्यक्तींना संगणक हाताळता यावे. 
- उच्च शिक्षणात दिव्यांग व्यक्तींचे प्रमाण वाढविणे. 
- दिव्यांग व्यक्तींचे रोजगाराभिमुख सक्षमीकरण, स्वावलंबी बनविणे. 
- समाजात दिव्यांग व्यक्तींविषयी असलेले गैरसमज दूर करणे. 
 
या आहेत सुविधा 
- स्क्रीन झुमिंग सॉफ्टवेअर. 
- संगणकातील तज्ज्ञांकडून प्रशिक्षण 
- आठ भारतीय भाषांसाठीचे स्क्रीन रीडर 
- पाठ्य मजकुराचे ध्वनी स्वरूपातील सॉफ्टवेअर. 
- हिंदी, मराठी, इंग्रजी भाषांसाठीचे ओसीआर सॉफ्टवेअर, 

समावेशी शिक्षण संसाधन केंद्राचे आजीवन सभासदत्व दिव्यांग व्यक्तींकरीता विनामूल्य असून त्यासाठी वयाची व शिक्षणाची कुठलीही अट नाही. यातून अनेक दिव्यांगांना उपयोग होत असून याचा लाभ सर्वांनी घ्यावा. 
-राम भावसार, केंद्र समन्वयक 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT