mahendra aahuja bhavna aahuja
mahendra aahuja bhavna aahuja 
उत्तर महाराष्ट्र

ट्रकने दाम्पत्याला चिरडले : आई-वडीलांच्या मृत्युने तीन आपत्त्ये अनाथ 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव :  पाळधी येथे आपल्या ग्राहकाकडे असलेल्या विवाह सोहळ्यासाठी निघालेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला कंटनेरने धडक दिली. अपघातात पती-पत्नी मागच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. महामार्गावर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समोर झालेल्या या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक जागीच थांबून होती. महेंद्र गोपालदास आहुजा (वय 48), भावना महेंद्र आहुजा (वय 48 दोघे रा. गायत्री नगर) अशी मयत पती पत्नीची नावे आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळाहून पसार झाला तर, हाती लागलेल्या क्‍लिनरला जागीच नागरीकांनी बदडून काढले. आई-वडीलांचे छत्र हरपल्याने मुलांनी प्रचंड आक्रोश केला होता. 

गायत्रीनगरात महेंद्र आहुजा पत्नी भावना, मुलाबाळांसह वास्तव्यास होते. त्यांचे फुले मार्केटमध्ये गोपालदास जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. नेहमीच मालाची खरेदीसाठी येणाऱ्या व परिचयाच्या ग्राहकाकडे शनिवारी विवाह सोहळा होता. पती-पत्नी दोघांनी लग्नाला यावे असा हट्ट ग्राहकाच्या कुटूंबीयांनी केल्याने आज महेंद्र व भावना हे दाम्पत्य सोबत दुचाकीने (एम.एच.19 ए.जे.8248) लग्नासाठी घरून निघाले. दादावाडी येथील घरीच लग्न असल्याचा समज झाल्याने दोघे दादावाडी येथील घरी पोहचले. मात्र, लग्न पाळधी येथील साईबाबा मंदिरावर असल्याचे समजल्याने दोघेही त्याच दुचाकीने पाळधीच्या दिशेने निघाले होते. दादावाडीतून निघाल्यावर काहीच अंतरावर महामार्गावर पाळधीकडेच जात असलेल्या कंटेरने(एम.एच.04 जी.एफ 0984) आहुजा यांच्या दुचाकीला धडक दिली. यात रस्त्यावर पडून कंटेरनच्या मागच्या चाकात दोघेही सापडले. चेहऱ्याला मार लागल्याने महेंद्र यांचा तर, मागील चाक डोक्‍यावरुन गेल्याने पत्नी भावना यांचा जागीच मृत्यु झाला. 

महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा 
राज्य महामार्ग असलेल्या रस्त्याचे काम अगदीसंत गतीने व असुरक्षीत पद्धतीने सुरु आहे. महामार्गावर बहुतांश ठिकाणावर दोन्ही बाजुने रस्ता खोदुन ठेवला आहे. बांभोरी पासून ते थेट तरसोद पर्यंत महामार्गावर तीच परिस्थीती असून विधानसभा निवडणुकी पासून कासवगतीने काम सुरु असून रोजच प्राणांतीक अपघातात नागरीकांना जीवास मुकावे लागत आहे. आज अपघात झाल्यानंतर बांभोरी पुला पासून ते थेट गुजराल पेट्रोल पंप आणि नदीच्या दुसरीकडून पाळधी पर्यंत वाहनांच्या लांबचलाब रांगा लागल्या होत्या. दोन तास पोलिसांना वाहतुक सुरळीत करण्यासाठी लागले. 

तिघ लेकरं अनाथ 
महेंद्र यांना किशोर आहुजा, ब्रिजलाल आहुजा व अशोक आहुजा हे तीन भाऊ तर शांतीदेवी, त्रिष्णादेवी, पुष्पा व सुनिता देवी अशा चार विवाहित बहीधी आहेत. महेंद्र हे सर्वात लहान होते. महेंद्र यांना वंशिका (वय 18), प्रिया (वय 12) व ओम (वय 8) अशी तीन मुले आहे. माता व पित्यावर एकाचवेळी अपघाताच्या रुपाने काळाने घातलेल्या झडपमुळे तीनही मुले पोरकी झाली. अपघाताची माहिती मिळताच नगरसेवक मनोज आहुजा यांच्यासह फुले मार्केटमधील व्यापारी व नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाकडे धाव घेतली. महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग असलेल्या या मार्गाने दाम्पत्याच्या रुपात आणखी दोन बळी घेतल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT