cornona 
उत्तर महाराष्ट्र

दिलासादायक...जळगावच्या कोरोनाग्रस्ताचा अहवाल निगेटिव्ह 

सकाळवृत्तसेवा

जळगाव : शहरात कोरोनाचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्या दिवसापासून त्या रुग्णाला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आल होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या रुग्णाचा पहिला रिपोर्ट आज मिळाला असून तो निगेटिव्ह आला आहे. मात्र, दुसरा रिपोर्ट अद्याप प्रलंबित असून तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णास कोरोनामुक्त जाहीर करुन घरी सोडण्यात येणार आहे. 

शहरातील गजबजलेल्या मेहरुण परिसरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. हा रुग्ण आढळून येताच हा संपूर्ण परिसर सील करुन याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. तसेच या रुग्णाच्या कुटूंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्यांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर जळगावकरांनी सुटकेचा निश्‍वास सोडला होता. या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल प्राप्त होताच त्या संशयीताला जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात आयसोलेट करण्यात आले होते. 14 दिवस या रुग्णावर आयसोलेशनमध्ये उपचार केल्यानंतर गेल्या दोन दिवसांपूर्वी या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील पहिला रिपोर्ट रुग्णालय प्रशासनाकला प्राप्त झाला असून त्या पॉझिटिव्ह रुग्णाचा पहिला अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. 

दुसऱ्या अहवालाची प्रतीक्षा 
चौदा दिवसानंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची दोनवेळा स्वॅब घेवून ते काही तपासणीसाठी पाठविले जात असतात. यात दोन दिवसापूर्वी धुळे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र रविवारी पाठविण्यात आलेल्या दुसऱ्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित असल्याने सर्वांना त्या अहवालाची प्रतीक्षा लागून आहे. 

जिल्ह्याची "ग्रीन झोन'कडे वाटचाल 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यापैकी दुसरा रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता जिल्ह्यात केवळ एकच पॉझिटिव्ह रुग्ण असून त्याचा पहिला अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाचा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आल्यास जळगाव जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये त्याचा समावेश होवून जळगावकरांना चांगला दिलासा मिळणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra MLC Election 2026 : पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची तारीख ठरली; आजपासून आचारसंहिता लागू

Meesho Share Price: दसरा-दिवाळीआधी Meesho चा शेअर सुसाट! 110% रिटर्न; बिझनेस मॉडेलची जोरदार चर्चा

'तोंड पुसायला बायकोची ओढणी नाही का?’ गौरी खानची सोडून शाहरुखने मॅनेजरच्या ओढणीने पुसला चेहरा, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले...

Hair Care Tips: ताक फक्त पिण्यासाठी नाही! केसातला कोंडा कमी करण्यासाठी असाही करता येतो वापर

Marathi News Live Updates : कोयना परिसरात भूकंपाचा धक्का !

SCROLL FOR NEXT